Home /News /entertainment /

दाट धुके, काळे ढग, हिरवागार परिसर; प्राजक्ता गायकवाडनं अनवाणी फिरत केली गडाची सैर

दाट धुके, काळे ढग, हिरवागार परिसर; प्राजक्ता गायकवाडनं अनवाणी फिरत केली गडाची सैर

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेली होती. तिने तिचे किल्ल्यावर काढलेले सुंदर फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

  मुंबई, 07 जुलै:  स्वराज रक्षक संभाजी ( Swarajya Rakshak Sambhaji) आई माझी काळूबाई ( Aai Majhi Kalubai) या  मालिकांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड ( Prajakta Gaikwad ) उत्तम अभिनयासह स्वभावातील साधेपणा यामुळे प्राजक्ता कायम प्रेक्षकांचं मन जिंकत असते. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. तिथे ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीजमती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच ती आषाढी वारीत सहभागी झाली होती. तिथले तिनं अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यानंतर प्राजक्ता थेट सिंहगडावर पोहोचली ( Prajakta Gaikwad visit Sinhagad Fort) तिथं तिनं थेट अनवाणी पायानं सिंहगडाची सफर केली. प्राजक्तानं घेतलेला हा अनुभव सर्वांबरोबर शेअर केला आहे. अलिकडेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेली होती. तिने तिचे किल्ल्यावर काढलेले सुंदर  फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. नुकताच तिने सिंहगड किल्ल्यावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओ मध्ये प्राजक्ता अनवाणी पायांनी गडावर फिरत आहे. दाट धुके, हिरवागार परिसर, काळे ढग अशा रम्य वातावरणात प्राजक्ता चप्पल न घालता चालत आहे. या व्हिडीओला तिने  'कधी तरी #without चप्पल चालण्याची मजाच वेगळी असते' असं कॅप्शन दिलं आहे. तसच तिच्या या व्हिडीओमध्ये 'पायी फुफाटा' हे अजय गोगवलेच प्रेरणादायी गाणंही ऐकायला मिळत आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा हटके अंदाज आवडला असून त्यांनी तिच्या पोस्टवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
  हेही वाचा - VIDEO: ठेवाल ना मला सुखात? लग्न होताच अमृतानं विचारला नवऱ्याला प्रश्न याआधी देखील प्राजक्तानं सिंहगडावरचा तिचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या खाली सुंदर कॅप्शन देत तिनं ओळखा हा किल्ला कोणता? असा प्रश्न केला होता. तिनं म्हटलं होतं, 'पुण्यापासून अगदी जवळ असलेला, सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगेवर असणारा, गिरीदुर्ग, अमृतेश्वर मंदिर, राजाराम महाराजांचे स्मारक त्याचप्रमाणे अनेक ऐतिहासिक स्थळे या किल्ल्यावर पाहायला मिळतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे पडणाऱ्या पावसात, धुक्यामध्ये, पिठलं-भाकरी, गरम गरम कांदा भजी, ठेचा ,चटणी यांसारखे चविष्ट पदार्थ खायला मिळतात. ओळखा पाहू किल्ला कोणता ?' दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती साध्या सिंपल लूकमध्ये दिसून येत आहे. तिच्यातील हाच साधेपणा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'स्वराज रक्षक संभाजी', 'आई माझी काळूबाई' अशा बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता सध्या टेलिव्हिजनवर कुठेही दिसत नसली तरी तिला लवकर नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Monsoon

  पुढील बातम्या