मुंबई 3 ऑगस्ट : प्रसिद्ध निवेदक, अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) गेले काही दिवसांपासून मोठ्या दुःखातून जात आहे. महिन्याभरापूर्वी तिने पती राज कौशलला (Raj Kaushal) गमावलं होतं. त्यानंतर तिच्यासह तिच्या मुलांवरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. पण आता मंदिरा त्यातून सावरत आहे. नुकताच तिने एक हसतमुख फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वर्कआऊट नंतरचा एक फोटो तिने शेअर केला आहे. ज्यात ती हसतमुख दिसत आहे. तर त्याला तिने कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं आहे, “जेव्हा माझी लहान मुलगी वर्कआऊट नंतर मला हसण्यास सांगते, तेव्हा एंडोमोर्फिन्स आपलं काम करतात. मी नकार कसा देऊ शकते.” मंदिराच्या या पोस्ट वर अनेक सेलिब्रिटींनी ही कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी तिच्या हिमतीला दाद दिली आहे.
मंदिरा आणि राज यांनी दोन मुलं आहेत. राज यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मुलगा वीर हा 10 वर्षांचा आहे ते मुलगी तारा ही 4 वर्षांची आहे. नुकताच ताराचा (Tara) वाढदिवस झाला. त्यावेळी तिने आपल्या मुलीला विश केलं. दरम्यान मागील वर्षी मंदिरा आणि राज यांनी ताराला दत्तक घेतलं होतं. तर मुलगा वीरचा (Veer) 2011 साली जन्म झाला होता.
मंदिरा सध्या आपल्या मुलांसोबतच जास्तीत जास्त वेळ घालवते. तर तिने पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. काही दिवांपूर्वीच ती घराबाहेरही स्पॉट झाली होती. तसेच सोशल मीडियावरही ती सक्रिय झाली आहे.