अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) पती राज कौशलच्या (Raj Kaushal) निधनांनतर तिचं जीवन पूर्वपदावर आणून सकारात्मकतेने जगण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या मुलीचा आज वाढदिवस असल्याने फोटो शेअर करत तिने मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
मंदिरा बेदीने सोशल मीडियावर मुलगी तारासोबत संपूर्म कुटुंबाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ’28 जुलै, एका वर्षाआधी, आजच्याच दिवशी तू आमच्या आयुष्यात आलीस, स्वीट-स्वीट तारा…. अशी मोठी पोस्ट लिहिली आहे. ताराचा हा ५ वा वाढदिवस आहे.
दरम्यान मंदिराने ताराला दत्तक घेतलं आहे. तर ती त्यांच्या आयुष्यात आली हाच दिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.
मागील महिण्यातच मंदिराचे पती दिग्दर्शक राज कौशल याचं निधन झालं होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात होतं.