मुंबई, 16 सप्टेंबर : स्टार प्रवाहवर 'होऊ दे धिंगाणा' हा नवा कोरा शो नुकताच सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दर आठवड्याला या शोमध्ये स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या मालिकेतील कलाकार येतात. दोन मालिकांचे कलाकार आमनेसामने येऊन त्यांच्या धम्माल गाण्यांचा कार्यक्रम रंगतो. या आठवड्यात ठिपक्यांची रांगोळी आणि सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहे. या विकेंडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात सिद्धार्थ जाधव ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुवा आई विठू बाबाला एक प्रश्न विचारतो आणि त्यानंतर सुवा आई म्हणजे अभिनेत्री लिना भागवत ढसाढसा रडू लागते.
ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील सुवा आई आणि विठू बाबा अर्थात सुवा आई म्हणजे अभिनेत्री लिना भागवत आणि मंगेश कदम खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत. दोघे एकाच नाटकात काम करत होते. तिथेच त्यांचे सुर जुळले आणि दोघांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - #WeekendPlan : तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये सुरू आहेत 'या' दमदार नाटकांचे प्रयोग
आता होऊदे धिंगाणाच्या मंचावर लिना आणि मंगेश यांच्याबरोबर सिद्धार्थ एक गेम खेळतो. दोघांना त्यांच्या लग्नाची तारीख विचारतो. सिद्धार्थच्या प्रश्नानंतर दोघेही जुन्या आठवणींमध्ये रंगतात. खेळाच्या शेवटी विठू बाबा सुवा आईला प्रपोज करत लग्न करशील माझ्याशी असं विचारतो. त्या क्षणी लिनाच्या डोळ्यासमोर मागचा काळ येतो आणि ती भावूक होऊन मंगेशला मिठी मारुन ढसाढसा रडते. दोघांचं प्रेम पाहून शोमध्ये आलेल्या सगळ्याच कलाकारांचे डोळे पाणवतात.
View this post on Instagram
लिना आणि मंगेश कदम यांची लव्हस्टोरी फारच खास आहे. नाटकाच्या दरम्यान दोघांच्या मैत्री झाली त्यातून प्रेम झालं आणि दोघांनी फार अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. झी मराठीवरील स्वप्निल जोशीची एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका सुरू असताना एक दिवस अचानक लिना आणि मंगेश यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. दोघांसाठी हा प्रवास फार कठीण होता.
मंगेश आणि लिना सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत एकत्र काम करत आहेत. त्याचप्रमाणे 'आमने सामने' हे त्यांचं कॉमेडी नाटकही सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.