Home /News /entertainment /

'सुशांत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी तयार', कंगनाच्या वकिलांनी पाठवले मुंबई पोलिसांना पत्र

'सुशांत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी तयार', कंगनाच्या वकिलांनी पाठवले मुंबई पोलिसांना पत्र

अभिनेत्री कंगना रणौतच्या वकिलांनी ती सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातील चौकशीसाठी सहकार्य करू इच्छित असल्याची माहिती मुंबई पोलिसांना पत्राद्वारे कळवलं आहे.

    मुंबई, 24 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (Sushant Singh Rajput Suicide) अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) तिच्या वकिलांमार्फत मुंबई पोलिसांना असे पत्र लिहिले आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीमध्ये ती सहकार्य करू इच्छिते. पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले की कंगना हिमाचल प्रदेश मध्ये असल्याने मुंबई पोलीस तिला तिथे भेटायला येऊ शकतात किंवा ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिचा जबाब नोंदवू शकते. दरम्यान बुधवारी वांद्रे पोलिसांनी कंगनाच्या चौकशीसाठी समन्स जारी केला होता. कंगना या चौकशीसाठी तयार आहे मात्र मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ती मुंबईत चौकशीला येण्यासाठी तयार नाही. त्यामुळे मनालीला एखादी टीम पाठवून चौकशी करू शकता, असं कंगनाने सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे मुूंबई पोलिसांनी समन्स पाठवल्यानंतर कंगनाच्या वकिलांनी त्यावर उत्तर दिले आहे. मनालीमध्ये तिच्या घरी पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्याची विनंती कंगनाने केली आहे. कंगनाच्या वकिलांनी या पत्रामध्ये लिहिले आहे की, 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने कंगना रणौत यांना वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये 27 जुलैपर्यंत निवेदन देण्यास सांगितले आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रकरणी माझी क्लायंट तुम्हाला मदत करू इच्छित आहे. 17 मार्च 2020 पासून, त्या हिमाचल प्रदेशमधील मनाली याठिकाणी असणाऱ्या घरात राहत आहेत आणि कोरोना व्हायरसमुळे जारी केलेल्या लॉकडाउन नियमांचे पालन करीत आहेत.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या