जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचा कोल्हापूरात भीषण अपघात; जागीच गेला जीव

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचा कोल्हापूरात भीषण अपघात; जागीच गेला जीव

अभिनेत्री कल्याणी कुरळे

अभिनेत्री कल्याणी कुरळे

मराठी मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघात झाला असून जागीच तिचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रतिनिधी, ज्ञानेश्वर साळुंखे मुंबई,13 नोव्हेंबर: मराठी मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघात झाला असून जागीच तिचा मृत्यू झाला आहे. कल्याणीचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही बातमी समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. यावेळी हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या बातमीमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

कल्याणीने आठवड्याभरापूर्वीच आपला वाढदिवस साजरा केला होता. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला होता, ज्यात ती भाकऱ्या थापताना दिसतेय. व्हिडीओ शेअर करत कल्याणीने म्हटलं, माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली… मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या… ही तिची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील राणा-अंजलीची जोडी तर लोकप्रिय झालीच पण त्यांच्यासोबतच मालिकेतील  इतर कलाकार देखील लोकप्रिय झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात