मुंबई 26 जुलै**:** जेष्ठ अभिनेत्री जयंती (Jayanthi) यांचं निधन झालं आहे. त्या 76 वर्षांच्या होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या. बंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. (Actress Jayanthi Passes Away) जयंती यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी ही दुखद बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. जयंती यांनी आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम होतं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीला मोठा झटका बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘महाराष्ट्रात राहून पैसे कमावता अन् संकट आलं की पळता’; अमेय खोपकर यांचा बॉलिवूडवर निशाणा जयंती यांचा जन्म कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अभिनयासोबत त्यांनी संगीत, दिग्दर्शन आणि पुढे निर्मिती या क्षेत्रातही काम केलं. 1960 ते 80 ही तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली होती. त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. जयंती यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.