मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Hemangi Kavi: 'लेक माझी दुर्गा' मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; लिहिली खास पोस्ट

Hemangi Kavi: 'लेक माझी दुर्गा' मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट; लिहिली खास पोस्ट

हेमांगीच्या मालिकेतील भूमिकेचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. तसंच तिचं तिच्या सहकलाकारांशी सुद्धा खूप छान बॉण्डिंग असलायचं नेहमी दिसून आलं आहे.

हेमांगीच्या मालिकेतील भूमिकेचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. तसंच तिचं तिच्या सहकलाकारांशी सुद्धा खूप छान बॉण्डिंग असलायचं नेहमी दिसून आलं आहे.

हेमांगीच्या मालिकेतील भूमिकेचं नेहमीच कौतुक होत आलं आहे. तसंच तिचं तिच्या सहकलाकारांशी सुद्धा खूप छान बॉण्डिंग असलायचं नेहमी दिसून आलं आहे.

मुंबई 26 जुलै: हेमांगी कवी ही अभिनेत्री सध्या मालिका आणि सिनेमा दोन्ही माध्यमांत झळकताना दिसत आहे. ही अभिनेत्री ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेत आजवर दिसून येत होती पण हेमांगीने या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं समोर येत आहे. (hemangi kavi lek majhi durga) आता ती मालिकेत दिसून येणार नाही असं समजत आहे. या निमित्ताने हेमांगीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेमांगीने आपला सहकलाकार सुशील इनामदारसाठी ही खास पोस्ट लिहिली असून यामध्ये ती भरभरून लिहिताना दिसत आहे. ती असं लिहिते, “लेक माझी दुर्गा मधला माझा comfort zone तू होतास. अनेक वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखत होतो, एकमेकांची कामं पाहत होतो पण कधी एकत्र काम नव्हतं केलं, ते lmd मुळे शक्य झालं. Thanks @chandrakantlokare आम्हांला जोडी म्हणून cast केलंस!☺️

पहिल्या दिवसापासून rather पहिल्या scene, shot पासून एक अजीब understanding होतं आपल्यात बहुतेक जसं तू म्हणतोस तसं नाटकामुळे आलं असेल पण जे काही होतं ते कमाल होतं. कितीतरी वेळा dialouges वर खाली व्हायचे, एकमेकांच्या lines आपण बोलायचो पण आपण दोघांनी scene कधी सोडला नाही आणि बहुतेकवेळा तेच जास्त work झालेलं आहे. डोळ्यातून एकमेकांना सावरत उचलत scene मस्त complete करायचो.

हे ही वाचा- Shreya Bugde: चला हवा येऊ द्या टीमसाठी मोठी खुशखबर, श्रेयाने दिली महत्त्वाची माहिती

खूप मज्जा आली, तू कसा solid actor आहेस वगैरे असलं मी काहीही पांचट बोलणार नाहीए, तुला माहितेय ते! पण तुझ्या सोबतचा प्रत्येक दिवस, scene, आपल्या न संपणाऱ्या गप्पा आठवणीत राहणार!

इतका हळवा पुरुष सह- कलाकार मी पाहिला नाही! मी project संपलं की लगेच dettached होणारी आहे तुला कळलं असेलच एव्हाना, तुला ही हे वरदान मिळो! ☺️ माझ्या शेवटच्या scene मध्ये तुझा फुटलेला बांध... मी कधीच विसरणार नाही! सुशील!”

हेमांगी आणि सुशील यांचे गोड आणि धमाल रील्स हा या जोडीमधला विशेष धागा आहे. हेमांगीने सुशीलला रील्सचं लावलेलं वेड त्याने जपावं असं सुद्धा तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या तिच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करताना दिसत आहेत. या दोघांच्याही जोडीला चाहत्यांनी एक सुंदर जोडी असं म्हणून प्रतिक्रिया दिली आहे. तसंच चाहते हेमांगीला मिस करतील असं सुद्धा म्हणताना दिसत आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment