अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तिची बहीण त्यांच्या सारखेपणामुळे नेहमी चर्चेत राहतात. त्यांचे फोटो पाहून तुम्हीही गोंधळून जाल. पाहा फोटो. भूमीची बहीण समिक्षा ही तिची जुळी बहीण आहे. त्यामुळे समिक्षा आणि भूमी यांच्यात फारच साम्य आहे. समिक्षा ही चित्रपटसृष्टीत नाही. पण सोशल मीडियावर दोघींचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. समिक्षा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. समिक्षा आणि भूमीतील साम्य त्यांच्या चाहत्यांना अनेकदा गोंधळातही टाकतं. इतकं दोघींमध्ये साम्य आहे. समिक्षा आणि भूमीने नुकतंच त्यांच्या आईसोबत एक फोटोशुट केलं होतं. दोघींचंही एकमेकींसोबत फार चांगलं बॉंडींग आहे. भूमीने दम लगा के हैशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. काही दिवसांपूर्वीच दोघींचाही वाढदिवस होऊन गेला. दोघींच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून फारच पसंत केलं जातं.