Home /News /entertainment /

"माझ्या पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेलं" उर्मिला मातोंडकर ट्रोलर्सवर संतापल्या

"माझ्या पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेलं" उर्मिला मातोंडकर ट्रोलर्सवर संतापल्या

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना त्यांच्या पतीच्या धर्मावर बरंच ट्रोलिंग सहन करावं लागलं आहे. इतके दिवस गप्प असलेल्या उर्मिला यांनी ट्रोलर्सना चांगलंच खडसावलं आहे.

    मुंबई, 19 डिसेंबर: उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar) अभिनयापासून दूर असोत. पण ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या प्रवेशही केला आहे. राजकारणातही त्या चांगलीच सक्रीय असते. अलिकडेच उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या पतीच्या धर्मावरुन ट्रोलर्सने लक्ष्य केलं. त्यावर उर्मिला  मातोंडकर यांनीही ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.  उर्मिला मातोंडकर यांच्या विकीपीडिया पेजवरही काही नमुन्यांनी आक्षेपार्ह बदल केले होते असं त्या म्हणाल्या. मोजो स्टोरीशी बातचीत करताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘माझे पती मोहसीन अख्तर मीर ( Mohsin Akhtar Mir) यांच्याबद्दल सोशल मीडियावर उलट्या-सुलट्या अफवा पसरवल्या जात आहेत. मोहसिन यांना दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटलं गेलं. काही लोकांनी माझ्या विकीपिडीया पेजवर बदल केले होते. त्यात माझ्या आई-वडिलांचं नाव बदलण्यात आलं. आईचं नाव रुखसाना अहमद आणि वडिलांचं नाव शिविंदर सिंह असं करण्यात आलं होतं.’ त्यांच्या वडिलांचं खरं नाव श्रीकांत मातोंडकर आणि आईचं नाव  सुनीता मातोंडकर  आहे. उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसिन अख्तर मीर यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं. ते काश्मिरी मुस्लीम आहेत आणि पेशाने मॉडेल आणि व्यावसायिक आहेत. त्यांच्या लग्नाची बरीच चर्च रंगली होती. तेव्हाही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. आता उर्मिला राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांना ट्रोल करण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांनी धर्मावर किंवा लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल संताप व्यक्त केला आहे. फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर, उर्मिला मातोंडकर यांनी बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं. रंगीला, जुदाई, सत्या, कौन, प्यार तूने क्या किया, भूत आणि एक हसीना थी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Trollers, Urmila Matondkar

    पुढील बातम्या