मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुबोध भावेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा! पुन्हा देणार सांगीतिक मेजवानी

सुबोध भावेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा! पुन्हा देणार सांगीतिक मेजवानी

सुबोध भावे

सुबोध भावे

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून सुबोध भावे यांची ओळख आहे. सुबोध भावे यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 नोव्हेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता म्हणून सुबोध भावे यांची ओळख आहे. सुबोध भावे यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रत्येक पात्र विशेष आणि दमदार बनवलं आहे. सुबोध भावे कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. अशातच सुबोध पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांनी शेअर केलेल्या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे. सुबोध भावेंनी या पोस्टमधून नव्या सिनेमाची घोषणी केली आहे.

सुबोध भावेंनी ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाल्याविषयी एक खास पोस्ट शेअर केलीये. यासोबत त्यांनी नव्या सिनेमाचीही घोषणा केल्याचं पहायला मिळालं. पोस्ट शेअर करत सुबोध भावेंनी लिहिलं, "कट्यार काळजात घुसली" 12 नोव्हेंबर 2015 एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष. संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं! अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत सुबोध भावेंनी आणखी एका संगीतमय चित्रपटाची घोषणा केली. त्यामुळे प्रेक्षकही नव्या संगीताची मेजवाणी अनुभवायला उत्सुक आहेत. 'कट्यार काळजात घुसली' नंतर सुबोध कोणता नवा सिनेमा घेऊन येणार, पुन्हा एकदा एखादं अजरामर नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेलं पहायला मिळालं. 12 नोव्हेंबर 2015 साली आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्य मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही या चित्रपटातील संगीत लोक आवर्जुन ऐकतात. या चित्रपटाने शास्त्रीय संगीताची वेगळी ओळख निर्माण करून दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी देखील तो डोक्यावर घेतला. हा चित्रपट मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित होता. या नाटकाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news, Subodh bhave