जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Mithilesh Chaturvedi: 'कोई मिल गया' फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

Mithilesh Chaturvedi: 'कोई मिल गया' फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

Mithilesh Chaturvedi: 'कोई मिल गया' फेम अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन

मिथिलेश यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्याचं समोर येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 04 ऑगस्ट: हिंदी सिनेसृष्टीसाठी एक अत्यंत दुःखद घटना समोर येत आहे. हिंदीतील एक दिग्ग्ज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं काल रात्रीच्या सुमारास निधन झाल्याचं समोर येत आहे. 3 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. गेले अनेक दिवस मिथिलेश हृदयरोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने सगळ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिल्याचं समोर आलं आहे.त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, “तुम्ही जगातले सर्वात सुंदर पिता होतात, तुमचा जावई असूनही मला तुम्ही मुलासारखं प्रेम दिलंत, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

मिथिलेश यांनी अनेक सुपरहिट प्रोजेक्टमध्ये अनेक चांगल्या भूमिका निभावल्या आहेत. कोई मिल गया, गदर एक प्रेमकथा, सत्या, बंटी और बबली, क्रिश ताल, अशोका, रेडी अशा एकाहून एक सरस कलाकृतींमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. तसंच या अभिनेत्याने बहुचर्चित स्कॅम 1992 या वेबसीरिजमध्ये सुद्धा भूमिका साकारली आहे. त्यांनी स्कॅम या सिरीजमध्ये रॅम जेठमलानी हे पात्र साकारलं होतं. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असल्याचं समजत असून अनेक चाहते त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. स्कॅम सिरीजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही मिथिलेश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या सोहसील मीडियावरून त्यांनी मिथिलेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मिथिलेश यांनी छोट्या पडद्यावर पतियाला बेब्स नावाच्या मालिकेत काम केलं आहे. तसंच ते अनेक जाहिरातींमध्ये सुद्धा झळकले आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा चर्चित सिनेमा ‘गुलाबो सिताबो’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अजून कोणताही अपडेट समोर आला नसला तरी त्यांचं निधनाने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात