जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कर्जबाजारी झाला आहे अभिनेता करणवीर बोहरा, Lock Upp मध्ये केले धक्कादायक खुलासे

कर्जबाजारी झाला आहे अभिनेता करणवीर बोहरा, Lock Upp मध्ये केले धक्कादायक खुलासे

कर्जबाजारी झाला आहे अभिनेता करणवीर बोहरा, Lock Upp मध्ये केले धक्कादायक खुलासे

‘लॉक अप’ (Lock Upp) या रिअ‍ॅलिटी शोची लोकप्रियता वाढण्यास सुरुवात झाली आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्यांची गुपितं उघड करायला सुरुवात केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई,15  मार्च-   कंगना  रणौत (Kangana Ranaut) होस्ट असलेल्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या रिअ‍ॅलिटी शोची लोकप्रियता वाढण्यास सुरुवात झाली आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्यांची गुपितं उघड करायला सुरुवात केल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सहभागी स्टार्सच्या ‘डार्क सिक्रेट्स’बाबत (Dark Secrets) जाणून घेतल्यानंतर खुद्द कंगना राणावतदेखील चक्रावून जात आहे. काही दिवसांपूर्वीच तेहसीन पूनावाला (Tehseen Poonawalla), शिवम शर्मा (Shivam Sharma) आणि सायशा शिंदे (Saisha Shinde) यांच्या कबुलीनंतर सर्वांनाच धक्का बसला. आता आणखी एका पॉप्युलर टीव्ही अभिनेत्यानं आपल्या लाइफ सिक्रेट्सबाबत खुलासा केला आहे. या वेळी टीव्ही अभिनेता करणवीर बोहरानं (Karanvir Bohra) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘लॉक अप’च्या स्पर्धकांशी बोलताना करणवीर बोहरानं दावा केला आहे, की गेल्या सात वर्षांपासून तो कर्जात (Debts) बुडालेला आहे. काम न मिळाल्यानं करणवीर बोहराची आर्थिक स्थिती खूपच डबघाईला आली आहे. एवढंच नाही, तर त्याच्यावर अनेक खटलेही (Criminal Cases) सुरू आहेत. कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बोलताना करणवीर बोहरा म्हणाला, ‘गेल्या सात वर्षांपासून मी करियरमध्ये काही विशेष करू शकलेलो नाही. मी अनेकांकडून कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांचे पैसे परत करण्याची माझी सध्या ऐपत राहिलेली नाही. त्यामुळे माझ्यावर चार-पाच खटलेही सुरू आहेत. मी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्जात बुडालो आहे, की इच्छा असूनही मला त्यातून बाहेर निघता येत नाही.’

    जाहिरात

    करणवीर पुढे म्हणाला, की ‘2015 पासून मी जे काही काम केलं आहे, त्यातून मिळालेली सर्व कमाई कर्जाची परतफेड (Loan Repayment) करण्यासाठी खर्च झाली. कर्जाचे हप्ते न भरल्यानं काही जणांनी मला न्यायालयात खेचलं आहे. सध्या माझ्यावर चार ते पाच खटले सुरू आहेत. मला माझ्या कुटुंबासाठी खूप वाईट वाटतं.’ तो त्याच्या कुटुंबाला चांगलं जीवन देऊ शकत नाही. याची त्याला कायम खंत वाटते. ‘माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यानं आत्महत्या केली असती. त्यामुळं हा शो माझ्यासाठी लाइफलाइन आहे,’ असंही त्यानं आवर्जून सांगितलं. (हे वाचा: ‘The Kashmir Files’ च्या प्रमोशनला कपिलने दिलेला नकार?अनुपम यांनी उघड केलं सत्य ) करणवीर बोहराचं बोलणं ऐकून सारा खान, गीता फोगट आणि सायशा खूपच चकित झाल्या. काही काळापूर्वी करणवीर ‘लॉक अप’मध्ये आपल्या मुलींची (Daughters) आठवण काढून रडला होता. त्याची अवस्था पाहून चाहतेही (Fans) भावूक झाले होते. विशेष म्हणजे ‘लॉक अप’मध्ये करणवीर बोहराला खूप पसंती मिळत आहे. अलीकडेच जेव्हा होस्ट कंगना राणावतनं ब्लू (Blue Team) आणि ऑरेंज टीमची (Orange Team) अदलाबदल केली, तेव्हा करणवीरचं निशा रावलसोबत भांडण झालं होतं. निशानं करणवीरवर धक्काबुक्की केल्याचा आरोप करून भविष्यात असं न करण्याचा इशारा दिला. करणवीरनं निशाची माफीही मागितली. करणवीर शोमध्ये किती पुढे जातो हे येणारा काळच सांगेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात