मुंबई 10 जुलै : झी मराठीवर (Zee Marathi) सध्या ‘अग्गबाई सुनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकेत सोहम म्हणून काम करत असणारा अभिनेता अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar) त्याच्या मालिकांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता त्याने चक्क सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने एक पोस्ट करत सगळ्यांनाच अचानक धक्का दिला आहे. अद्वैत हा सोशल मीडियावर फार सक्रिय दिसायचा. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळायचे. अनेकदा तो त्याच्या मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसायचा. पण अचानक त्याने घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यानांच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
त्याने पोस्टमध्ये लिहिल आहे, ‘सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम डिअॅक्टिव्हेट करत आहे. कदाचित काही काळासाठी… माहित नाही परत कधी येईन. मी ओके आहे. त्यामुळे काय झालं वगैरे विचारायला फोन करू नये’, अशी नोट लिहीत त्याने पोस्ट केली आहे. (Adwait Dadrkar deactivated Instagram)
अद्वैत सध्या ‘अग्गबाई सुनबाई’मध्ये खलनायकाची भूमिका साकरत आहे. तर याआधी तो झी मराठीवरीलच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) या मालिकेत काम करत होता. त्यातील त्याची सौमित्र ही व्यक्तिरेखा विशेष लोकप्रिय ठरली होती.
‘अकेले हम अकेले तुम’ आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट; पत्नीने केले होते हिंसाचाराचे आरोपअद्वैत केवळ एक अभिनेताचं नाही तर एक दिग्दर्शक आणि लेखकही आहे. काही नाटकांचं लेखण त्याने केलं आहे. याशिवाय अद्वैतची अग्गबाई सुनबाई मालिका देखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. लवरकच मालिकेचं शुटींग गुंडाळलं जाणार असून पुढील माहिन्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे.

)







