जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Resham Tipnis : रेशम टिपणीस पुन्हा दिसणार वकिलाच्या भूमिकेत; 'अबोली' मालिकेत करणार रिएन्ट्री

Resham Tipnis : रेशम टिपणीस पुन्हा दिसणार वकिलाच्या भूमिकेत; 'अबोली' मालिकेत करणार रिएन्ट्री

Resham Tipnis in Aboli serial

Resham Tipnis in Aboli serial

स्टार प्रवाह वरील अबोली या मालिकेत रेशीम टिपणीसने आधी विजया राजाध्यक्ष या वकिलाची भूमिका निभावली होती. मध्यंतरी तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस पुन्हा एकदा ‘अबोली’ या मालिकेत एंट्री करणार आहे. स्टार प्रवाह वरील अबोली या मालिकेत रेशीम टिपणीसने आधी विजया राजाध्यक्ष या वकिलाची भूमिका निभावली होती. मध्यंतरी तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण आता ती पुन्हा मालिकेत त्याच वकिलाच्या भूमिकेत परतणार आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या भूमिकेचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. अबोली या मालिकेतून रेशीमने खूप वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. सध्या अबोली मालिकेत वेगळाच ट्रक सुरु आहे. या मालिकेत सोहमचा खून झाला आहे. त्याचा खून कोणी  केला असेल याचा तपास  सध्या अंकुश करत आहे. त्याला अबोलीचा संशय येतो.  त्याचा तपास त्याला अबोली पर्यंत घेऊन जातो.   येणाऱ्या  काळात अंकुश अबोलीलाच सोहमच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करणार आहे. त्यामुळे मालिकेत आता येणाऱ्या काळात जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. अशातच आता विजया राजाध्यक्ष या वकिलाच्या भूमिकेत रेशीम टिपणीस पुन्हा मालिकेत एंट्री घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता  वाढली आहे.

जाहिरात

रेशीम टिपणीस मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसेच ती सध्या हिंदी मालिकांमध्येही काम करत आहे. ती सोनी टीव्ही वरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत द्वारकाबाईंची भूमिका करत आहे. याआधी मराठमोळी अभिनेत्री सुखदा खांडकेकर हि भूमिका करत होती. या मालिकेसोबतच रेशीम टिपणीस दंगल टीव्ही वरील ब्रिज के गोपाल या मालिकेतही महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. हेही वाचा - Sayali Sanjeev : राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सायलीनं पहिल्यांदाच बाबांसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली… अबोली हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अबोलीची भूमिका गौरी कुलकर्णी हि अभिनेत्री साकारत असून तिच्यासह  सचित पाटील, शर्मिष्ठा राऊत, प्रतीक्षा लोणकर आणि उदय टिकेकर या बड्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. येणाऱ्या भागांमध्ये अबोली आलेल्या संकटाला कशी सामोरे जाते, तिने खरंच सोहमचा खून केला आहे का,  अंकुशपासून ती काही लपवत आहे या गोष्टींचा उलगडा होणार आहे. मालिका आता एका रंजक वळणावर आली असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात