मुंबई, 18 ऑगस्ट : सध्या सगळीकडे श्रावणातील सणांची रेलचेल आहे. मंगळागौर, रक्षाबंधन हे सण उत्साहात साजरे होत आहेत. मराठी मालिकांमध्ये हे सण मोठ्या थाटामाटात साजरे ट्रेंड सध्या सुरु आहे. जवळजवळ प्रत्येक मराठी मालिकेत आतापर्यंत मंगळागौर आणि रक्षाबंधन साजरे केले गेले. त्यानुसार मालिकेच्या कथानकातसुद्धा बदल करण्यात आला. ह्या सणांच्या निमित्ताने बऱ्याच मालिकांमध्ये ट्विस्ट दाखवण्यात आले. प्रेक्षकांनीही त्याला चांगलाच प्रतिसाद दिला. आता आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्याचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. अबोली मालिकेतसुद्धा दहीहंडी फोडत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या मालिकेचा एक मजेदार व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये मालिकेतील कलाकार एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत आहेत. तसेच दहिहंडी सजवलेली देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. आता मालिकेत सगळं सुरळीत झाल्यावर अंकुश आणि अबोली एकत्र येत दहीहंडी साजरी करणार असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
अबोलीवरील सगळी संकटं दूर होऊन ती घरी परतली आहे. आता मालिकेत येणाऱ्या भागात दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्याचा BTS व्हिडीओ समोर शूटिंगदरम्यान मालिकेतील कलाकार धमाल करताना दिसून येत आहेत.
हेही वाचा - Neha Joshi : अभिनेत्री नेहा जोशीनं 'या' अभिनेत्याबरोबर गुपचूप उरकलं लग्न; फोटो आले समोर
स्टार प्रवाहावरील अबोली ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. दरम्यानच्या काळात या मालिकेत प्रचंड उलथापालथ झाली. सोहंच्या खुनाचा आळ अबोलीने स्वतःवर घेतला होता त्यासाठी तिला अटक करण्यात आली होती. तसेच तिच्यावर जीवघेणा प्रसंग देखील ओढवला होता. पण अंकुशने तिला या सगळ्यातून बाहेर काढले. त्यामुळे सध्या हि मालिका चांगल्या वळणावर पाहायला मिळत आहे.
अबोली हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अबोलीची भूमिका गौरी कुलकर्णी हि अभिनेत्री साकारत असून तिच्यासह सचित पाटील, शर्मिष्ठा राऊत, प्रतीक्षा लोणकर आणि उदय टिकेकर या बड्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. त्यासोबतच नुकतीच मालिकेत अभिनेता गौरव घाणेकर आणि रेशीम टिपणीस यांनी देखील एंट्री केली होती. या दोघांनीही मालिकेत वकिलाची भूमिका साकारली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.