मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘हे लोक कुत्र्यासारखे भुंकतात अन् ऑटोट्यून करतात’; अभिजित भट्टाचार्य संतापले

‘हे लोक कुत्र्यासारखे भुंकतात अन् ऑटोट्यून करतात’; अभिजित भट्टाचार्य संतापले

‘बॉलिवूड कलाकार कुत्र्यांसारखं भुंकण्याला आज गायन म्हणतायेत’; ऑटोट्यूनवर अभिजित भट्टाचार्य यांनी व्यक्त केला राग

‘बॉलिवूड कलाकार कुत्र्यांसारखं भुंकण्याला आज गायन म्हणतायेत’; ऑटोट्यूनवर अभिजित भट्टाचार्य यांनी व्यक्त केला राग

‘बॉलिवूड कलाकार कुत्र्यांसारखं भुंकण्याला आज गायन म्हणतायेत’; ऑटोट्यूनवर अभिजित भट्टाचार्य यांनी व्यक्त केला राग

मुंबई 10 जून: अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) हे बॉलिवूडमधील एक नामांकित गायक म्हणून ओळखले जातात. खुबसुरत, मै कोई ऐसा गीत गाऊ, सुनो ना सुनो ना, बडी मुश्कील है यांसारखी शेकडो सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहे. (Abhijeet Bhattacharya Best song) जवळपास दोन दशकं आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर राज्य करणारे अभिजित सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. (Bollywood song) त्यांना सध्या गाणीच मिळत नाहीयेत अन् यासाठी त्यांनी ऑटोट्यूनला जबाबदार धरलं आहे.

बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत अभिजित यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी ऑटोट्यूनच्या मदतीनं गाणं गाणाऱ्या कलाकारांवर देखील जोरदार टीका केली. ही कलाकार कुत्र्यासारखे भोंकतात अन् त्याला गाणं म्हणतात असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.ते म्हणाले, “एक काळ होता जेव्हा लोक एक गाणं गाण्यापूर्वी तासंतास रियाज करायचे. एखाद्या कडव्यातील सूर चुकला की ते पुन्हा एकदा गायचे. पण आज जमाना बदलला आहे. लोक तोंड वर करुन येतात. काही कुत्र्यांसारखं भोंकतात. त्याला ऑटोट्यूनमध्ये एडिट करतात. अन् गाणं म्हणून प्रेक्षकांसमोर सादर करतात. अशा कलाकारांना खरंच गायक म्हणावं का? असा प्रश्न पडतोय.”

तो एक KISS पडला होता भारी; वाढदिवशीच मिका सिंग गेला होता तुरुंगात

" isDesktop="true" id="563025" >

Desirable Women होताच रिया चक्रवर्तीचा भाव वधारला? मिळाली थेट दौपदीची भूमिका

यापुढे ते म्हणाले, “आमच्या पिढीच्या गायकांना आज कामच मिळत नाही. कारण आम्हाला त्यांच्यासारखं गाणं गाता येत नाही. आज माझा आवाज माझ्या पिकवर आहे परंतु तरी देखील अशा प्रकारचं गाणं मी गाऊ शकेन असं वाटत नाही. किंबहूना अशा फसवेगीरीपासून मी दूर आहे याचंच समादान वाटतं. ही बॉलिवूड कलाकार लोकांचा फसवत आहेत.” असं म्हणत अभिजित यांनी आपला राग व्यक्त केला.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actor, Entertainment, Song