नवी दिल्ली, 27 जुलै : आमिर खानची (Aamir Khan) लाडकी कन्या इरा खान (Ira Khan) तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चाहत्यांना तिचा बिनधास्त अंदाज नेहमीच आवडतो. लोक तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बराच इंटरेस्ट घेताना दिसतात. इरा नेहमीच बॉयफ्रेंड नुपूर शिखर (Nupur Shikhare) सोबत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या इरा आपल्या प्रियकरासोबत हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी घालवित आहे. (Aamir Khans daughter Troll due to cigarettes and lighters she shared the photo ) 26 जुलै रोजी सकाळी इराने आपला एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती एक कुत्र्यासोबत खूप रिलॅक्स करताना दिसत आहे. मात्र इरा, कुत्र्याशिवाय तेथील एका गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. इराच्या शेजारी एक सिगारेटचं पॅकेट आणि लायटर दिसत आहे. यामुळे युजर्सने तिला ट्रोल केलं आहे. नेटकरी तिला सिगारेटबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, थोडं फार काम पण करा मॅडम, तर दुसऱ्या एकाने विचारलं आहे की, तुम्ही कोणती सिगारेट ओढता? हे ही वाचा- ‘शिल्पा शेट्टीला हे काळे धंदे नक्कीच माहित असणार’; शक्तिमानचा जोरदार टोला
तिसरी एक व्यक्ती सिगारेट आणि लायटर फोकसमध्ये आल्याचं म्हणते. फोटोमध्ये इऱा काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये खूप कूल दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला असून त्यावर निळ्या रंगाचं डेनिम जॅकेट आणि शॉट्स घातली आहे.