जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपिका पादुकोणचा फोटो व्हायरल; Good News का म्हणून पुन्हा सोशल मीडियाने केला कहर

दीपिका पादुकोणचा फोटो व्हायरल; Good News का म्हणून पुन्हा सोशल मीडियाने केला कहर

दीपिका पादुकोणचा फोटो व्हायरल; Good News का म्हणून पुन्हा सोशल मीडियाने केला कहर

दीपिका पादुकोणने (deepika padukone) नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये सस्पेन्स तयार झाला आहे. दीपिका लवकरच आई बनणार आहे का? असा प्रश्न विचारून दीपिकाला पुन्हा हैराण करण्यात येतंय

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 फेब्रुवारी: बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) दीपिका पादुकोणने (Deepika padukone) नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे. कारण दीपिका सोशल मीडियावर मोजक्याच पोस्ट करत असतो. आजचा हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये सस्पेन्स तयार झाला आहे. दीपिका लवकरच आई बनणार आहे का? असा  प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंतून ती प्रेग्नन्सीचे संकेत देवू पाहत आहे का? असं अनेक चाहत्यांना वाटत आहे. दीपिका पादुकोणने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या पोटाच्या दिशेने पाहत आहे. ज्यामध्ये तिच्या गालावर आलेली लाली स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो शेअर करताने तिने कॅप्शनमध्ये केवळ ‘फेब्रुवारी’ असं लिहिलं आहे. त्यामुळे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी म्हटलं आहे, की दीपिरा गुड न्युज देणार आहे. तिने या फोटोतून ती आई होणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी तिने संकेत दिले आहेत. दीपिकाने हा फोटो टाकून चाहत्यांसोबत मीडियामध्येही सस्पेन्स तयार केला आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे एकमेकांना 6 वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर ती अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग बनली आहे. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. दीपिका पादुकोण ऋतिक रोशनसोबत फायटर या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटात धमाका करणार आहे. शाहरुख खान शेवटचा चित्रपट फॅन असून तो बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळला होता. त्यामुळे शाहरुख आता तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागम करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात