जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिर खान बनणार गुलजार यांचा नवा शेजारी? अभिनेत्याला पाली हिलमध्ये हवंय घर

आमिर खान बनणार गुलजार यांचा नवा शेजारी? अभिनेत्याला पाली हिलमध्ये हवंय घर

आमिर खान बनणार गुलजार यांचा नवा शेजारी? अभिनेत्याला पाली हिलमध्ये हवंय घर

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सतत आपल्या हटके गोष्टींमुळे चर्चेत असतो. त्याला मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. हा अभिनेता सध्या आपल्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता आमिर खान   (Aamir Khan)   सतत आपल्या हटके गोष्टींमुळे चर्चेत असतो. त्याला मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. हा अभिनेता सध्या आपल्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.या चित्रपटाचे ‘कहानी’ हे पहिलं गाणं रिलीज करून आमिरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे. आमिर बऱ्याच दिवसांनी पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीसोबतच आमिर त्याच्या नवीन घराच्या   (Searching New Home)  शोधात व्यस्त आहे. नवरोज बिल्डिंग हे मुंबईतील सर्वात आलिशान बांधकामांपैकी एक आहे जे आगामी काळात पाली हिल्सचा भाग असेल. बांधकाम पूर्ण झालं असलं तरी यातील अनेक फ्लॅट्स रिकामेच आहेत. ते विकत घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. कारण त्याच्या किंमती तितक्याच अफाट आहेत. टाईम्सच्या बातमीनुसार, बॉलिवूड अभिनेता आमिर खान गुलजार यांच्या बंगल्याच्या शेजारी असलेल्या नवरोजमध्ये अपार्टमेंट शोधत आहे. टाईम्सच्या बातमीनुसार, आमिर खानने अद्याप डील फायनल केलेली नाही पण त्याला नवरोजमध्ये आपलं नवं घर घ्यायचं आहे. किंवा लवकरच दुसऱ्या कोणत्याही इमारतीत शिफ्ट करण्याचा त्याचा विचार आहे. आमिरला मरिना किंवा बेला व्हिस्टा या इमारतीत जास्त काळ राहायचं नाही हे स्पष्ट झालं आहे. मात्र, अभिनेता नवरोजमध्ये गुंतवणुकीसाठी अपार्टमेंट शोधत असेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.नुकतंच आमिर खानने कार्टर रोडवरील फ्रिडा वन बिल्डिंगमध्ये भाड्याने फ्लॅट खरेदी केलं आहे. त्या वेळी जॅकी श्रॉफ आणि त्यांचं कुटुंबही तिथे राहात होतं. 2013 मध्ये देखील अशी बातमी आली होती की आमिर खान लोअर परेलमध्ये घर शोधत आहे. त्यावेळी आमिरला पाली हिल सोडायचं आहे अशी प्रचंड अफवा पसरली होती. परंतु असं काहीही घडलं नव्हतं. त्या निव्वळ अफवा ठरल्या होत्या. त्यामुळे हे स्पष्ट झालं की, पाली हिल अजूनही अभिनेत्याच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे आणि कदाचित कायम राहील. Aamir Khan 57th birthday

Aamir Khan 57th birthday

लाल सिंह चड्ढा रिलीज डेट- आमिर खानच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, तो त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यापूर्वी हा चित्रपट 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र आता 11 ऑगस्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर आणि शर्मन जोशी दिसणार आहेत.चाहते आमिरला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात