मुंबई, 5 जुलै- बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे.त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंचर आमिर बॉलिवूडमध्ये दिसलेला नाही. त्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर आमिर खानने फिल्मी दुनियेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आमिर खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन करावे,असे आमिर खानच्या चाहत्यांना वाटते. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आमिर लवकरच बॉलिवूडमध्ये परत येणार आहे, आणि त्याची तयारी देखील त्याने सुरू केली आहे. आमिर खानचे नाव एका बायोपिकशी जोडले जात आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करणार आहेत. हा एक बायोपिक असणार आहे. आमिर खानने या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. या बायोपिकचे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2024 पासून सुरू होणार आहे.राजकुमार हिरानी सध्या शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत. वाचा- ‘72 हूरें’ च्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल; मुस्लिम समाजाने केलाय हा आरोप आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली आहे. आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये ‘3 इडियट्स’मध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांची जोडी ‘पीके’ चित्रपटात एकत्र दिसली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.
आमिर खानने ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक केलं होतं. आमिर आणि करिनाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप झाला. ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाकडून आमिरला खूप अपेक्षा होत्या. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने त्याला धक्का बसला आणि पुन्हा काही दिवस सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा त्याने निर्णय घेतला. काही दिवसापूर्वी आमिरने गिप्पी ग्रेवाल आणि सोनम बाजवाच्या ‘कॅरी ऑन जट्टा 3’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान आमिरने सिनेसृष्टीतील कमबॅकबद्दल भाष्य केलं. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणाला,“अद्याप कोणताही सिनेमा करण्याचा निर्णय घेतलेला नाही. सध्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मुलांसोबत वेळ घालवायला मला आवडत आहे. सिनेसृष्टीत कमबॅक करण्याची अजून माझी मानसिक तयारी झाली नाही. जेव्हा मी पूर्णपणे तयार असेल तेव्हा नक्कीच मी एखादं चांगले कथानक असेल अशा सिनेमाची निवड करेल”. आता आमिर कमबॅकसाठी तयार झाला आहे.