मुंबई, 7 मे- आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte ) मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येत कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेत संजनाची भूनिका अभिनेत्री रूपाली भोसले साकारताना दिसते. संजनाची भूमिका नकारात्मक असली तरी संजनाचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. सध्या संजना फेम रूपाली भोसलेनं मालिकेतून ब्रेक घेतल्याचे दिसत आहे. कारणही तसचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि रूपाली भोसले कोकणात मस्त सुट्टयांचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर याचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. रूपाली भोसलेनं तिच्या इन्स्टाला कोकण वारीचे काही फोटो शेअर केले आहेत. रूपाली तिच्या कुटुंबासोबत सध्या कोकणात सुट्टयांचा आनंद घेत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मस्त कोकणात रूपाली घरच्या मंडळींसोबत मस्ती करताना दिसत आहे. वाचा- बनारसी शालू,नाकात नथ, हातात हिरवा चूडा;शिवानीने शेअर केला लग्नानंतरचा FIRST PIC रुपाली भोसलेच्या पायाला काही दिवसापूर्वी मालिकेत एक सीन करताना दुखापत झाली होती. पण काम महत्त्वाचं समजत तिनं तिचं शुटींग पूर्ण केलं होतं. रूपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. रूपाली नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलनं चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. रूपाली नेहमीच तिच्या लुकच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. तिच्या स्टाईल अनकेजण कॉपी करताना दिसतात. सोशल मीडियावर तिच्या फॅशन सेन्सची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते.
बिग बॉस मराठीमुळे रूपाली भोसले नाव चर्चेत आलं. मात्र आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे रूपालीला लोकप्रियता व एक वेगळी ओळख मिळाली. आज तिला संजना या नावाने ओळखतात खरं तर ही तिच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.
आई कुठे काय करते मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. संजनाने नुकताच झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता ती सुखरूप आहे. अनिरुद्ध तिला घटस्फोट देणार आहे, या भीतीनं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं होतं. मात्र आता अरुंधतीनं देखील याबबतीत अनिरुद्धची समजूत घातली आहे.