अभिनेता मिलिंग गवळी यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमनं मोठ्या जल्लोषात वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.
मिलिंदसाठी दोन थरांचा केक आणण्यात आला होता. ज्यावर त्यांनी आतापर्यंत केलेल्या सिनेमांचे फोटो लावण्यात आले होते.
देशमुखांच्या गार्डनमध्ये मिलिंदच्या वाझदिवसाच सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी केक कटिंग करताना टीमनं चक्क आरती गात मिलिंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे पाहून मिलिंदही काही वेळ अवाक झाले होते.
सेलिब्रेशन इथेच थांबलं नाही तर शुटींगवरुन उशिरा घरी गेल्यानंतरही मिलिंद यांची पत्नी दीपा हिनं त्यांच्यासाठी खास बर्थ सप्राइज अरेंज केलं होतं.