आई कुठे काय करते मालिकेतील 'सोबतीस हलके' हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि 24 तासातच गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
सुखाचे चांदणे' या पहिल्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मालिकेतील या नव्या गाण्यानं नवीन रेकॉर्ड तयार केला आहे.
मालिकेतील साईड साँग यूट्यूबवर ट्रेडिंगमध्ये असण्याची ही पहिलीच वेळ आणि पहिलीच मालिका आहे असं म्हणायला हरकत नाही.
गाण्याचा BTS व्हिडीओ देखील प्रदर्शित झाला आहे. ज्यात कलाकारांनी गाणं शुट करताना केलेली सगळी धम्माल पाहायला मिळत आहे.
सोबतीस हलके, सावलीस ऊन… भोवती तशी ही, मोरपीस खूण… असे गाण्याचे सुंदर शब्द गायक श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत.
अरुंधती आणि आशुतोष यांच पहिलं एकत्र रोमँटिक गाणं You Tubeवर सध्या गाणं सहाव्या (6 on Trending) क्रमांकावर आहे