जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bindi Controversy : 'टिकली लावून आपण बावळट वाटतो'; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Bindi Controversy : 'टिकली लावून आपण बावळट वाटतो'; 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

राधिका देशपांडे

राधिका देशपांडे

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री राधिका देशपांडे हिनी टिकली प्रकरणावर भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं काय म्हटलं आहे जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 नोव्हेंबर :  सध्या महाराष्ट्रात टिकली ही विषय चांगलाच गाजतोय.  शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टिकली हा विषय चर्चेत आला आहे. एका महिला पत्रकाराशी बोलण्यासाठी त्यांना आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असं संभाजी भिडे यांचं वक्तव्य सध्या वादात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या वक्तव्याचा निषेध केला जातोय. अनेक जण यावर मत मांडत आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं टिकली विषयावर आपलं मत मांडत सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच आई कुठे काय करते या प्रसिद्ध मालिकेतील देविका. मालिकेत अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका देविकानं साकारली आहे. देविका हे पात्र सध्या मालिकेत दिसत नसलं तरी काही महत्त्वाच्या भागांमध्ये देविकाची एंट्री होत असते. देविका म्हणजे अभिनेत्री राधिका देशपांडे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक विषयांवर ती तिचं मत मांडत असते. सध्या सुरू असलेल्या कुंकू टिकली आणि बाईट या विषयावर तिनं भाष्य केलं आहे. हेही वाचा - Marathi Serials: बिग बॉस पुढेही ठरतेय दीपा, गौरी भारी; TRP रेसमध्ये ‘या’ आहेत TOP 5 मालिका राधिकानं म्हटलं आहे , ‘बिंदू मात्र असलेली ही इवलीशी टिकली सध्या हेडलाईन्सच्या मध्यभागी आहे. खरंतर ही ‘फोरहेड‘ म्हणजे कपाळाच्या मध्यभागी बघायला मिळते. अर्थातच स्त्रियांच्या! पण सध्या ती तिथून दिसेनाशी झाली आहे. कधीतरी दिसते, कधी पुसट, अधून मधून दिसते पण काहींनी ती दिसेनाशी व्हावी म्हणजे इतिहास जमा व्हावी असं चित्र रंगवणं सुरू केलं आहे’. वाचा राधिकाची संपूर्ण पोस्ट

जाहिरात

राधिकानं पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे की,  ‘खरंतर टिकली हा वादाचा, चर्चेचा विषय नसून लावण्याचा विषय आहे. टिकली ज्याला आवडते तिने ती लावावी. लावायचा आग्रह असावा, हरकत नसावी, जबरदस्ती नसावी. एवढे स्वातंत्र्य आपल्याला आहे, असं म्हणत तिनं तिचं मत मांडलं आहे’.

News18लोकमत
News18लोकमत

राधिकाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर  राधिकानं याआधी अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘व्हेनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ या सिनेमात काम कंल आहे. आई कुठे काय करते मालिकेत राधिकाला प्रसिद्धी मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात