मुंबई,23 एप्रिल- आज जगभरात ‘जागतिक ग्रंथ दिन’ (World Book Day) साजरा केला जात आहे. आज वाचनप्रेमींसाठी हा दिवस फारच खास आहे. ‘वाचाल तर वाचाल’ असं आपण अनेकवेळा ऐकलं आणि वाचलं आहे. वाचनाने आपल्या ज्ञानात भर तर पडतेच शिवाय आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आत्मसात होतो. त्यामुळे या इंटरनेटच्या युगात आजही अनेक लोक पुस्तक वाचनावर भर देतात. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाच विविध स्वरूपाच्या पुस्तकांची आवड असते. जागतिक ग्रंथ दिनाचं निमित्त साधत ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Prabhulkar) एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती घराघरात पोहोचली आहे. अरुंधतीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. ही लोकप्रिय भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे. या मालिकेने मधुराणीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. या मालिकेमुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते सतत अभिनेत्रीबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. मधुराणीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या विविध अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. आजही अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. मधुराणी प्रभुलकर इन्स्टा पोस्ट- मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं , भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं….वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय.सेटवर एक , मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात … तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची…. जमेल तसं…दोन पानं कधी चार . पण वाचायचं…वाचत राहायचं.जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा’.
सोबत मधुराणीने आपण सध्या कोणती पुस्तके वाचण्यासाठी घेतली आहेत, याबाबतही खुलासा केला आहे. याबद्दल सांगताना तिने लिहिलंय, ‘‘सध्या मी वाचत असलेली पुस्तकं १. मंद्र . भैरप्पा २. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने ३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख. तुम्ही काय वाचताय??? असं म्हणत अभिनेत्रीने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.