काय आहे पोस्ट- मधुरानी प्रभुलकरने पोस्ट करत लिहिलं आहे, 'अरुंधती म्हणून आपण सर्व मला रोज आई कुठे काय करते ह्या दैनंदिन मालिकेत पाहता... पण मधुराणी म्हणून माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही एक स्वतंत्र डेली सोप चालूच असतो . जसे अरुंधती च्या आयुष्यात चढ उतार येतात तसे माझ्याही आयुष्यात चालू असतात.गेले २ वर्ष मी ही मालिका करतेय. शूट मुंबईत असतं आणि माझी मुलगी आणि नवरा पुण्यात...! स्वरालीला मी खूपखूप दिवस भेटत नाही , तिच्या आयुष्यातल्या काही छोट्या पण निरागस आनंदात मी नसते. कधी तिच्या छोट्या मोठ्या आजारपणात मी नसते... कधीकधी मी २० /२० दिवस तिला भेटू शकत नाही. काम करताना हे सल आणि मुलीची ओढ आणि आठवण सतत माझ्याबरोबर असते ... (हे वाचा:'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे ... ) 'पण तिची काळजी अशी नसते कारण प्रमोद त्याचे व्याप सांभाळून अतिशय मायेने सगळं करतो पण ह्यात अतिशय मोलाचा वाटा आहे तो आमच्या support स्टाफ चा.स्वराली ला शाळेसाठी तयार करणे, नेऊन सोडणे ( तिची शाळा व्यवस्थित ऑफ line सुरू आहे ... त्याबद्दल नंतर लिहीन ) , तिच्या आवडीचं खायला करणे, खायला घालणे , तिच्याशी खेळणे, तिची नाटकं सहन करणे , तिच्या इतर activities साठी पाठवणे.… ही सगळी आणि त्याहीपेक्षा कितीतरी जास्त काम ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करतात म्हणून मी निर्धास्तपणे काम करू शकते.आपण भरतकामाची नक्षी पाहतो आणि त्याचं कौतुक करतो पण मागच्या बाजूला वेगळी वीण असते, अनेक टाके आणि गाठीही असतात त्या आधारावर ते नक्षीकाम उभं असतं.प्रमोद आहे , माझी आईही असते त्याच बरोबर हा इतका प्रेमळ आणि खंबीर स्टाफ आहे म्हणून अरुंधती आहे. विजय, अमोल , अनिता , ज्योती , अनुराधा , आशा ,ऋतुजा, अमृता .... तुम्हाला भरभरून प्रेम'अशी पोस्ट करत मधुरानीने सर्वांचे आभार मानले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment