मुंबई,27 एप्रिल- देशाचे दिग्गज संगीतकार-गायक एआर. रहमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. असं म्हटलं जातं की, ते फारच कमी बोलतात पण जेव्हा बोलतात तेव्हा ते वक्तव्य प्रचंड व्हायरल होतं. एआर. रहमान यांनी अनेकवेळा खुलेआम हिंदीला डावलत तामिळ भाषेवर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. नुकतंच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात ‘पोनियिन सेल्वन’चे संगीतकार एआर. रहमान आपल्या पत्नीसोबत स्टेजवर सर्वांशी संवाद साधताना दिसले. यादरम्यान, असं काही घडलं की, ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संगीतकार एआर. रहमान नुकतंच चेन्नईतील एका पुरस्कार सोहळ्यात आपल्या पत्नीसोबत सहभागी झाले होते.
संगीतकार फारच कमी आपल्या कुटुंबासोबत कॅमेऱ्यात कैद होतात. त्यांच्या कुटुंबाला लाइमलाईटपासून दूर राहणं पसंत असल्याचं अनेकवेळा त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सोहळ्यात एआर. रहमान यांनी असं काही केलं की, आता सोशल मीडियावर विविध प्रकारची चर्चा सुरु आहे. (हे वाचा: अमिताभसोबत ब्रेकअपनंतर रेखांनी कोणाशी केलेलं लग्न? पतीने गळफास घेत संपवलेलं आयुष्य ) या पुरस्कार सोहळ्यात एआर. रहमान आपली पत्नी सायरा बानोसोबत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांची पत्नी उपस्थितांशी हिंदीत संवाद साधायला सुरुवात केली. यावेळी रहमान यांनी आपल्या पत्नीला मध्येच थांबवत तिला हिंदीऐवजी तामिळमध्ये बोलण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्याला पाहून लोक सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एआर रहमान आणि सायरा दोघेही स्टेजवर एकत्र दिसत आहेत. यादरम्यान एआर रहमान तामिळमध्ये म्हणाले, ‘मला माझी मुलाखत पुन्हा पाहणं आवडत नाही. तर माझी पत्नी ती पुन्हा पुन्हा व्हिडिओ प्ले करते आणि पाहत राहते कारण तिला माझा आवाज आवडतो. तसेच ती मला माझ्या चुका शोधून दाखवते’. त्यांनतर होस्ट सायरा बानो यांना बोलण्यास सांगतो.
கேப்புல பெர்பாமென்ஸ் பண்ணிடாப்ள பெரிய பாய்
— black cat (@Cat__offi) April 25, 2023
ஹிந்தில பேசாதீங்க தமிழ்ல பேசுங்க ப்ளீஸ் 😁 pic.twitter.com/Mji93XjjID
सायरा यांनी हातात माईक घेऊन हिंदी शब्द तोंडातून काढताच एआर रहमानने त्यांना मध्येच थांबवत, ‘हिंदीत नव्हे तर तामिळमध्ये बोल असं सांगितलं.’ हे ऐकून सायरा हसत म्हणाली - ‘अरे देवा.. माझी तामिळ इतकी चांगली नाहीय. त्यामुळे मला क्षमा असावी. मी इंग्लिशमध्येच बोलेन असं म्हणत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.