बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचं खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. रेखा जेव्हा आपल्या करिअरच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांचं नाव अनेक बॉलिवूड नायकांशी जोडलं गेलं होतं. परंतु अमिताभ बच्चन यांच्यासोबतची त्यांची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेत आली होती.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या भेटीपूर्वीच अमिताभ आणि जया भादुरी यांचं लग्न झालं होतं. रेखासोबतच्या अफेयरमुळे अमिताभ यांचं वैवाहिक आयुष्य अडचणीत आलं होतं. त्यामुळे हे नातं पुढे जाऊ शकलं नाही.
अमिताभसोबत विभक्त झाल्यानंतर पुढे रेखा यांनी अचानक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्नगाठ बांधत सर्वांना धक्का दिला होता.
रेखा यांचं लग्न दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी १९९० मध्ये झालं होतं. त्यावेळी या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. कारण रेखाच्या आयुष्यात मुकेश अचानक आले होते आणि दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
सिमी अग्रवाल यांनी आपल्या शोमध्ये रेखांना मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न आणि पहिली भेट याबद्दल विचारलं असता रेखा यांनी रंजक उत्तर दिलं होतं.
याबाबत बोलताना रेखांनी म्हटलं होतं की, 'मी माझ्या करिअरच्या त्या टप्प्यावर होते, जिथे मला वाटले की मी लग्न करावं आणि मी ते केलं. आपण कुठे भेटलो, कधी भेटलो, कसे भेटलो हे महत्त्वाचं नसतं. आम्ही भेटलो आणि आम्ही लग्न केलं हे महत्वाचं होतं. या लग्नातून मला काय शिकायला मिळालं किंवा मी काय गमावलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे मुकेश यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं. व्यवसायात होत असलेल्या तोट्यामुळेआणि वैवाहिक आयुष्यात चालू असलेल्या अडचणींमुळे ते त्यावेळी तणावात असल्याचं सांगितलं जातं.