मुंबई, 30 ऑक्टोबर- ए.आर. रहमान हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. जे त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी ओळखले जातात. ए. आर. रहमान नेहमीच हे एक अतिशय शांत आणि लाइमलाईटपासून दूर राहणारे कलाकार आहेत. त्यांना आपल्या खाजगी गोष्टी मीडियासमोर आणणं फारसं पसंत नाही. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो फारच क्वचित शेअर करत असतात. काही काळापूर्वी रहमान आपल्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आले होते. आता संगीतकार एआर रहमान यांची मुलगी खतिजा रहमानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने एक मार्मिक नोटही लिहिली आहे. सध्या ही प्रचंड चर्चेत आहे. आणि ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ए. आर. रहमान यांची लेक खतिजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या म्युझिकल प्रोजेक्टसच्या अपडेट्स चाहत्यांना देत असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते, परंतु ती नेहमीच नकाबमध्ये दिसून येते. नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका प्रेरणादायी पोस्टमध्ये खतिजा रहमानने तिच्या 'फरिश्तो' म्युझिक व्हिडिओला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. खतिजाने ही पोस्ट शेअर करत लिहलंय की, 'फरिश्तो आणि फरिश्ता रिलीज होऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. हा प्रवास सुरु करताना माझ्या मनात अनेक प्रश्न होते. मी या चौकटीत बसू शकेन का? ट्रेंड किंवा कपड्यांचा नवीन ट्रेंड फॉलो करणं?
(हे वाचा: Alia Bhatt: आलिया भट्ट बहिणीच्या बर्थडेला देणार बाळाला जन्म; समोर आली ड्यू डेट)
View this post on Instagram
खतिजाने पोस्टमध्ये पुढे लिहलंय, 'मी जशी आहे तशी लोक मला स्वीकारतील का? आणि मी जे कपडे परिधान करते , त्या कपड्यांना पाहणं लोक पसंत करतील का? मी अजूनही एका मिनिटापेक्षा जास्त काळ संगीत बनवू शकेन आणि सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकेन? पण कोणत्याही अटीशिवाय प्रचंड प्रेम आणि पाठिंबा तसेच देवाच्या कृपेने मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. असं म्हणत खतिजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
खतिजा पुढे म्हणते, 'सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे होय आहेत. हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि तुम्हा सर्वांसाठी आणखी काम करायला मला खूप बरं वाटतं. 'फरिश्तो' दहा लाख व्ह्यूजपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागलं आणि आम्ही अजून विचार करत आहोत की हे पुढे कसं जाणार'. खतिजाच्या या मार्मिक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ए आर रहमान यांची लेक असूनसुद्धा खतिजाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या आवाज आणि कौशल्याच्या जोरावर तिने आपला एक विशिष्ट चाहतावर्ग निर्माण केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: A. R. Rahman, Bollywood, Entertainment