मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Vaibhav Tatwawaadi: वैभव तत्ववादी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज, आणखी एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण

Vaibhav Tatwawaadi: वैभव तत्ववादी चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज, आणखी एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण

 Vaibhav Tatwawadi

Vaibhav Tatwawadi

अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi). अशातच वैभवनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

  मुंबई, 18 ऑगस्ट : अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi). वैभवनं फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये वैभवचा चाहतावर्ग तगडा आहे. वैभव हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच वैभवनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. वैभव तत्ववादी सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी तो लंडनला गेला होता. आता त्याचं शूटिंग पूर्ण झालं असून त्यानं इन्स्टाग्रामवर त्याविषयी फोटो शेअर केला आहे. 'पॅकअप' म्हणत वैभवनं लंडनमधील फोटो शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. याशिवाय त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे आता वैभवच्या चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळणार असल्याचं दिसतंय. आणखी एका चित्रपटातून वैभव चाहत्यांच्या भेटीला येणार. अद्याप त्यानं चित्रपटाचं नाव जाहीर केलेलं नाही.
  वैभव हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार तर आहेच, पण बॉलिवूडमध्येही तो चांगलाच पसंतीचा चेहरा आहे. अभिनयाव्यतिरीक्त तो फिटनेस फ्रीकही आहे. तो फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक फिटनेस व्हिडीओ शेअर करते असतो. हेही वाचा -  Amruta Khanvilkar : चंद्राच्या मनमोहक रूपानं घेतली नवऱ्याची विकेट; अमृताला गुलाबी साडीत पाहून हिमांशू म्हणाला... मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा चाहतावर्ग मोठा आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना आपण त्याला पाहिलं आहे. त्याच्या अभिनयानं तो नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असतो. सध्या वैभवकडे अनेक आगामी प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे तो शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment, Vaibhav tattvavadi

  पुढील बातम्या