मराठमोळी चंद्रमुखी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
अमृतानं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या साडीतील सौंदर्यांवर चाहते घायाळ झालेले पहायला मिळतायेत.
सध्या तिचं हे साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षावदेखील होतोय.
अमृताच्या सौदर्यावर तिच्या नवऱ्याचीही विकेट पडलेली पहायला मिळाली. अमृताचा नवरा हिमांशू मल्हेत्रानं तिच्या फोटोंवर 'खूबसूरत' अशी कमेंट केली आहे.
अमृताने आतापर्यंत तिच्या नृत्याने प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच आहे आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.