मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या मराठी चित्रपटानं मारली बाजी; ‘राष्ट्रीय पुरस्कारा’वर कोरलं नाव

या मराठी चित्रपटानं मारली बाजी; ‘राष्ट्रीय पुरस्कारा’वर कोरलं नाव

वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 मार्च: दरवर्षी प्रमाणे यंदाही केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. (National Film Awards 2019)या सोहळ्यात ‘बार्डो’नं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. (Best Marathi Film Bardo) या चित्रपटासाठी दिग्दर्शक भीमराव मुंडे यांना सन्मानित केलं गेलं. दरम्यान मराठी प्रेक्षकांनी या पुरस्कारासाठी भीमराव मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

वर्षभरात प्रदर्शित झालेल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मनोरंजन सृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं गेल्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा एक वर्षानंतर साजरा केला जात आहे. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फ़िल्म फेस्टिवल या संस्थेतर्फे दिला जातो. ही संस्था माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत काम करते. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जातो.

अवश्य पाहा - कंगना रानौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; या चित्रपटांसाठी पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

" isDesktop="true" id="532911" >

बार्डो हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंजली पाटील, गिरीश परदेशी, अशोक परदेशी यांसारख्या नामांकित मराठी कलाकारांनी काम केलं आहे. रितू फिल्म्स कट प्रोडक्शन व पांचजन्य प्रोडक्शन प्रा.ली यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. या चित्रपटाला तिकिटबारीव फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र समिक्षकांनी या चित्रपटाची तोंड भरुन स्तुती केली होती. जीवनाच्या प्रवासात इच्छितस्थळी पोहोचताना घडणाऱ्या गंमती जंमती या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment