Home /News /entertainment /

तापसी पन्नूची कंगना रणौतवर मात; पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

तापसी पन्नूची कंगना रणौतवर मात; पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

कंगना आणि तापसी या दोन अभिनेत्रींमध्ये सध्या शीतयुद्ध सुरु आहे. दोन्ही अभिनेत्री सतत सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर शाब्दिक वार करताना दिसतात.

    मुंबई 28 मार्च: दरवर्षी प्रमाणे यंदाही फिल्म फेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. (66th Filmfare Awards 2021) फिल्म फेअर हा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधील कलाकारांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदाच्या वर्षी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. लक्षवेधी बाब म्हणजे या विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) देखील नामांकन मिळालं होतं. पण कंगनावर मात करत तापसीनं बाजी मारली. कंगना आणि तापसी या दोन अभिनेत्रींमध्ये सध्या शीतयुद्ध सुरु आहे. दोन्ही अभिनेत्री सतत सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर शाब्दिक वार करताना दिसतात. आश्चर्याची बाब म्हणजे या युद्धात आता त्यांच्या चाहत्यांनी देखील उडी घेतली आहे. कंगनानं जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तापसीवर जोरदार टीका केली होती. याला म्हणतात अभिनय असा टोला तिला लगावला होता. अन् आता फिल्मफेअर पुरस्कारात तापसीनं कंगनावर मात करत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. या पार्श्वभूमीवर आता तापसीचे चाहते कंगनासा ट्रोल करताना दिसत आहेत. तापसीसोबतच सैफ अली खानला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शिवाय दिवंगत अभिनेता इरफान खान याला देखील फिल्म फेअरनं मरणोत्तर सन्मान दिला. पाहूया सर्व विजेत्यांची नावं... अवश्य पाहा - ‘माझी सख्खी बायको गेली’ हे गाणं कसं तयार झालं? पाहा संगीतकाराचा भन्नाट किस्सा बेस्ट अ‍ॅक्टर- इन अ लीडिंग रोल- इरफान खान, फिल्म- अंग्रेजी ​मीडियम बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, इन अ लीडिंग रोल- तापसी पन्नू , फिल्म- थप्पड़ बेस्ट फिल्म: थप्पड़ बेस्ट अ‍ॅक्शन: तन्हाजी: द अनसंग वॉरियर: रमज़ान बुलट, आरपी यादव सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ओम राउत, फिल्म, तानाजी: द अनसंग वॉरियर सर्वोत्कृष्ट अभिनेता (आलोचक): अमिताभ बच्चन, फिल्म गुलाबो-सिताबो सर्वोत्कृष्ट संवाद : जूही चतुर्वेदी, फिल्म गुलाबो-सिताबो बेस्ट कोरियोग्राफी: फराह खान, फिल्म दिल बेचार सर्वोत्कृष्ट फिल्म (क्रिटिक्स): प्रतीक वत्स, ईब अलाय ऊ! बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल): राघव चैतन्य, फिल्म थप्पड़, गाना- ‘एक टुकडा धूप’ बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल): ‘मलंग’ टाइटल ट्रैक के लिए असीस कौर बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: थप्पड़: मंगेश उर्मिला धाकड़ सर्वोत्कृष्ट सिनेमैटोग्राफी: अविकमुखोपाध्याय, गुलाबो सिताबो बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन: वीरा कपूरी, गुलाबो सिताबो सर्वोत्कृष्ट संपादन: यशा पुष्पा रामचंदानी, थप्पड़ बेस्ट प्रोडक्शन डिजाइन: मानसी ध्रुव मेहता, गुलाबो सिताबो बेस्ट साउंड डिज़ाइन: कामोद खराड़े, थप्पड़ सर्वोत्कृष्ट वीएफएक्स: प्रसाद सुतार, तानाजी: द अनसंग योद्धा बेस्ट म्यूजिक एल्बम: प्रीतम फॉर लूडो
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut, National film awards, Star celebraties, Taapsee Pannu

    पुढील बातम्या