मुंबई 5 एप्रिल: तमिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. (Tamil Nadu Legislative Assembly election) या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम (MMM) या राजकीय पक्षाचे संस्थापक कमल हसन (Kamal Hassan) यांनी एक खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे. राजकारण (politics) हे जनतेच्या सेवेचं एक उत्तम माध्यम आहे. अन् जनतेची सेवा करताना तर चित्रपटांचा अडसर होत असेल तर ते सिनेसृष्टीतून कायमची निवृत्ती घ्यायला तयार आहेत, असं घोषणा त्यांनी केली आहे. या घोषणेमुळं त्यांचे चाहते देखील अवाक् झाले आहेत.
नेमकं काय म्हणाले कमल हासन?
नुकत्याच दिलेल्या एका भाषणात कमल हासन यांनी आपल्या राजकीय भवितव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “मी देशातील त्या 30 टक्के लोकांपैकी एक होतो जे राजकारणापासून पुर्णपणे अलिप्त राहतात. परंतु परिस्थितीनं मला राजकारणात येण्यात भाग पाडलं. आता मी माझं पुर्ण लक्ष जनतेच्या सेवेसाठी केंद्रित करणार आहे. अन् हे कार्य करत असताना जर माझं फिल्मी करिअर आड येत असेल तर मी चित्रपटसृष्टी कायमची सोडून द्यायला तयार आहे. माझे विरोधक म्हणतायेत हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. काही दिवसांनी मी राजकारणातून गायब होईन. आता जनताच ठरवेल कोणाला गायब करायचं ते.”
कलम हासन यांच्या या वक्तव्यामुळं सध्या एकच खळबळ माजली आहे. कोईम्बतूर साऊत वेस्ट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं अपक्ष उमेदवार पलनीकुमार यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Entertainment, Politics (Professional Field)