जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonali Kulkarni: दिल चाहता है ची 21 वर्ष अन् अभिनेत्रीला आठवले चमकीले दिन; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sonali Kulkarni: दिल चाहता है ची 21 वर्ष अन् अभिनेत्रीला आठवले चमकीले दिन; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sonali Kulkarni: दिल चाहता है ची 21 वर्ष अन् अभिनेत्रीला आठवले चमकीले दिन; पोस्ट शेअर करत म्हणाली...

अनेकांना दिल चाहता है म्हटलं की एक खूप मोठया आठवणींचा खजिना उघडल्यासारखं वाटत असेल. या सिनेमात एक मराठी चेहरा सुद्धा आहे तो तुम्हाला नक्कीच माहित असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 ऑगस्ट: बॉलिवूडमधले काही सिनेमे कल्ट सिनेमे समजले जातात. असाच एक कळतं क्लासिक सिनेमा म्हणजे दिल चाहता है. 2000 दशकाच्या सुरुवातीला आलेल्या या सिनेमाने तरुणाईला अक्षरशः वेडं करून सोडलं. या सिनेमामध्ये दाखवलेली मैत्री, सिनेमाचं कथानक, रोड ट्रिपचा संदर्भ अशा अनेक गोष्टी लक्षात राहिल्या. मराठी प्रेक्षकांसाठी याहून जास्त लक्षात राहिली ती एक अभिनेत्री म्हणजे (sonali kulkarni in dil chahta hai) सोनाली कुलकर्णी. दिल चाहता है म्हणलं की अनेकांना आठवते ती वो लडकी है कहाँ वर सैफ सोबत नाचणारी सोनाली. या सिनेमामुळे सोनालीला एक वेगळी ओळख मिळाली. या सिनेमाला नुकतीच एकवीस वर्ष पूर्ण झाली असून सोनालीने यानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. यामध्ये सोनालीला ओळखणं सुद्धा कठीण होईल एवढं वेगळं रूप दिसून येत आहे. हे ही वाचा-  Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: किती वेळा येणार नवी दयाबेन; भूमिकेसाठी आणखी एका अभिनेत्रीचं नाव चर्चेत या थ्रोबॅक फोटोंना कॅप्शन देत ती लिहिते. “Dil Chahta Hai .. कभी ना बीते चमकीले दिन ” तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी तिच्या या क्लासिक सिनेमातील भूमिकेचं कौतुक केलं आहे. हेमांगी कवीने “कालच पाहिला! अजूनही तेवढाच fresh वाटतो हा सिनेमा आणि त्यात तुझं गाणं आणि तू तर म्हणजे सदाबहार ❤️” अशी कमेंट केली आहे.

जाहिरात

याशिवाय फरहान अख्तर आणि प्रीती झिंटा यांनी सुद्धा खास व्हिडिओ शेअर करून सिनेमाच्या एकवीस वर्षांचा प्रवास शेअर केला आहे. या सिनेमाची जादू आजही तशीच टिकून आहे.

सिनेमात आजही असलेला एक रिफ्रेशिंग टच अनेकांना तरुणपणाच्या आठवणीत घेऊन जातो. तसंच सिनेमात असलेली गाणी आणि डायलॉग यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.

जाहिरात

सोनालीच्या या पोस्टवर तिला भरभरून कमेंट आणि लाईक्स मिळत आहेत. आज एवढ्या वर्षांनी सिनेमाशी निगडित अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात