जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Hingoli Teacher Suicide : मुलांना म्हणाला लघुशंकेला जाऊन येतो, नंतर शिक्षकाचा थेट मृतदेहच परत आला

Hingoli Teacher Suicide : मुलांना म्हणाला लघुशंकेला जाऊन येतो, नंतर शिक्षकाचा थेट मृतदेहच परत आला

Hingoli Teacher Suicide : मुलांना म्हणाला लघुशंकेला जाऊन येतो, नंतर शिक्षकाचा थेट मृतदेहच परत आला

शिक्षक लोडबा रामा गायकवाड हे जालना (Jalna) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक (ZP Teacher) म्हणून कार्यरत होते. उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने ते आपल्या मुळगावी गाडीबोरी येथे आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

हिंगोली, 27 मे : दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये (Suicide Incidence) वाढ होत असल्याचे दिसत आहेत. नागपुरात एका वकिलाने आत्महत्या (Doctor Suicide) केल्याची घटना ताजी असतानाच हिंगोलीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्यात मुलांना थांबवलं अन्… सासुरवाडीकडे निघालेल्या एका शिक्षकाने आत्महत्या (Teacher Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. लोडबा रामा गायकवाड (वय 37, रा. गाडी बोरी, ता. हिंगोली), असे मृत शिक्षकाचे नाव आहे. उन्हाळी सुट्ट्यात ते गावी परतले होते. यानंतर या शिक्षकाने मुलांना मामाच्या घरी सोडतो म्हणून घर सोडले आणि पिंपळदरी शिवारात आपल्या दोन मुलांना रस्त्यात दुचाकीवर थांबवले आणि झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 मेला गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत शिक्षक लोडबा रामा गायकवाड हे जालना (Jalna) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक (ZP Teacher) म्हणून कार्यरत होते. उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने ते आपल्या मुळगावी गाडीबोरी येथे आले होते. तेथून त्यांनी आपल्या मुलांना सासुरवाडीत भटसावंगी येथे सोडतो, असे सांगून ते सकाळच्या सुमारास दुचाकीवर निघाले होते. यादरम्यान सासुरवाडीकडे जात असतानात त्यांनी रस्त्यातच पिंपळदरी येथील शिवारात आपली दुचाकी थांबवली. यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना वाहनावरच थांबा, असे सांगितले. शिक्षक गायकवाड यांनी यानंतर बाजूला पिंपळदरी शिवारात जाऊन झाडाला गळफास लावला आणि आपले जीवन संपवले. हेही वाचा -  17 वर्षे वाट पाहिली बेपत्ता मुलाची, अखेर वडिलांनी उचललं मोठं पाऊल

दुसरीकडे आपले वडील बराच वेळ होऊनही आले नाही म्हणून त्यांची मुले रडु लागली. यावेळी तेथील रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी या मुलांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमचे वडील बराच वेळ झाला लघुशंकेला गेले आहेत. मात्र, ते परत आले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी परिसरात जाऊन चौकशी केली असता, लोडबा गायकवाड या शिक्षकाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात