मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बापरे! गर्लफ्रेंडचे ‘डोळे उघडून’ लुटले 18 लाख, चोरीची पद्धत वाचून बसेल धक्का

बापरे! गर्लफ्रेंडचे ‘डोळे उघडून’ लुटले 18 लाख, चोरीची पद्धत वाचून बसेल धक्का

तरुणीला गुंगीचं औषध देऊन आणि तिच्या पापण्यांचा वापर करून तरुणाने लाखो रुपये लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीला गुंगीचं औषध देऊन आणि तिच्या पापण्यांचा वापर करून तरुणाने लाखो रुपये लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीला गुंगीचं औषध देऊन आणि तिच्या पापण्यांचा वापर करून तरुणाने लाखो रुपये लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: आपल्या गर्लफ्रेंडच्या चेहऱ्याचा (Face of girlfriend) वापर करून तिच्याच बँक खात्यातील (Bank account) लाखो रुपये (Lakhs of rupees) तरुणानं लंपास (Fraud) केले. सध्या सायबर क्राईमच्या अनेक (Crime incidences) घटना समोर येत आहेत. मात्र ऑनाईन फ्रॉड करणारे अनेकजण प्रत्यक्ष डोळ्यांना मात्र दिसत नाहीत. मात्र या तरुणाने गर्लफ्रेंड सोबत असताना तिच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास केले आहेत.

अशी केली चोरी

मूळच्या चिनी असणाऱ्या हुआंग नावाच्या 28 वर्षांच्या या सराईत गुन्हेगारानं काही महिन्यांपूर्वी एका तरुणीशी डेटिंग ऍपवरून संपर्क साधला. काही दिवसांतच त्यांची मैत्री झाली आणि प्रत्यक्ष भेट झाली. भेटीनंतर काही दिवसांनी तो गर्लफ्रेंडला त्याच्या घरी घेऊन आला आणि तिला खायला काही पदार्थ करून दिले. हे पदार्थ बनवल्यानंतर त्यात त्याने गुंगीचं औषध टाकलं आणि जेवण झाल्यावर काही मिनिटांतच तरुणी बेशुद्ध झाली.

फेस रेकग्निशनचा वापर

तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तातडीने तिचा मोबाईल काढून घेतला आणि तिच्या बोटांचा वापर करत तो अनलॉक केला. त्यानंतर तिचं Alipay अकाऊंट ओपन करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यावेळी त्यासाठी तरुणीचं फेस रेकग्निशन गरजेचं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग मोबाईल तरुणीच्या चेहऱ्यासमोर पकडत त्याने तिचा चेहरा स्कॅन केला आणि लॉग-इन केलं. मात्र बँकेच्या सुरक्षा नियमांनुसार अद्यापही तरुणाला पैसे ट्रान्सफर करता येणार नव्हते. त्यासाठी तरुणीच्या डोळ्यांचं स्कॅनिंग करणं आवश्यक होतं. तरुणाने गुंगीत असलेल्या तरुणीच्या पापण्या पकडून तिचे डोळे उघडले आणि मोबाईल समोर पकडत डोळ्यांचं स्कॅनिंग केलं. त्यानंतर मात्र तरुणाला तिच्या अकाउंटचा एक्सेस मिळाला आणि त्याने तब्बल 18 लाख रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले.

हे वाचा - येरवडा जेलमध्ये बसून गँग चालवण्याचा कट, पोलिसांचा कैद्यांना मास्टरस्ट्रोक

बदलला पासवर्ड

तरुणीला लगेच संशय येऊन आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी त्याने तरुणीच्या अकाउंटचा पासवर्डही बदलून टाकला. त्यामुळे तरुणीने पासवर्ड रिसेट करून अकाउंटची माहिती घेण्यापूर्वीच त्याने स्वतःच्या खात्यातील रक्कम दुसऱ्याच जागी ट्रान्सफर केली. मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास करत तरुणाला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला नुकतीच साडेतीन वर्षं कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

First published:

Tags: Crime, Financial fraud, Girlfriend