Home /News /crime /

येरवडा जेलमधील सराईत गुन्हेगारांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची नामी शक्कल

येरवडा जेलमधील सराईत गुन्हेगारांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची नामी शक्कल

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

भाईगिरीसह दादगिरी करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येते. त्यानंतर त्यांची एक वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येते. पण हे सगळे गुंड येरवडा जेलमध्येच एकत्र येतात आणि तिथूनच आपआपल्या गँग ऑपरेट करु लागतात.

पुढे वाचा ...
  चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 13 डिसेंबर : पुणे (Pune) शहरातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएनुसार (NPDS Act) कारवाई केल्यानंतर त्यांची रवानगी आता येरवडा कारागृहाऐवजी (Yerwada jail) थेट औरंगाबाद (Aurangabad) आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Jail) करण्यात येणार आहे. गुन्हेगारांची येरवडा कारागृहातील साखळी अर्थात गँग (Gangsters Gang) फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनीच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाईगिरीसह दादगिरी करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येते. त्यानंतर त्यांची एक वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात येते. पण हे सगळे गुंड येरवडा जेलमध्येच एकत्र येतात आणि तिथूनच आपआपल्या गँग ऑपरेट करु लागतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

  कारागृहातूनही सराईत गुन्हेगार सक्रिय

  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की, येरवडा जेल काही सराईत गुंडांसाठी एक अड्डाच बनून जातो. तसेच इतर आरोपींसोबतही त्यांचे लागेबंधे तयार होतात. त्यामुळे कारागृहातूनही सराईत गुन्हेगार सक्रिय असल्याचे दिसून आले होते. येरवडा कारागृहातील सराईतांची हीच साखळी तोडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आहे. एमपीडीएनुसार कारवाई केलेल्या सराईतांना औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठविले जाणार आहे. त्यामुळे सराईतांचा इतर ओळखीच्या आरोपींसोबत होणारा संपर्क कमी होणार आहे. त्याशिवाय आरोपींना भेटण्यासाठी सहजासहजी संधी निर्माण होणार नाहीत. हेही वाचा : नागपुरात भाजप आमदाराच्या मुलाकडून गौण खनिजाची चोरी, दोन ट्रक जप्त

  स्वारगेट हद्दीत दहशत पसरविणाऱ्या आरोपी औरंगाबादच्या कारागृहात स्थानबद्ध

  दरम्यान, स्वारगेट हद्दीत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीएनुसार एक वर्ष औरंगाबाद कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. रवींद्र वसंत कांबळे (वय 30, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे. त्याने साथीदारांसह स्वारगेट, खडक, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तलवार, रॉड, कोयता, बांबूसह जीवघेणी हत्यारे घेऊन खुनाचा प्रयत्न, अपहरण, बाललैंगिक अपराध, जबरी चोरी, दुखापत, जबर दुखापत यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. हेही वाचा : '...तर आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी महापालिका निवडणूक लढवणार नाही', इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा स्वारगेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी कांबळेविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. दरम्यान, मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये 47 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.

  पुणे पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

  याबाबत अधिक माहिती देताना पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, सराईतांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाई केल्यानंतर शिक्षेसाठी त्यांना औरंगाबाद आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविले जाणार आहे. त्यांची येरवडा कारागृहातील तयार होणारी साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईताची औरंगाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या