जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवकाचा मृतदेह, घटनास्थळावरील स्थिती पाहून पोलीस हादरले

रक्ताच्या थारोळ्यात आढळला युवकाचा मृतदेह, घटनास्थळावरील स्थिती पाहून पोलीस हादरले

तरुणाची गोळी झाडून हत्या

तरुणाची गोळी झाडून हत्या

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचा आढळला.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बोकारो, 20 मे : झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात एका व्यक्तीचा गोळी झाडून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास गोळीबाराचा आवाज स्थानिकांनी ऐकला होता. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. चास पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचा आढळला. घटनास्थळावरून पोलिसांनी गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. तर मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो फुदनीडीह इथला असून विष्णु शर्मा असं त्याचं नाव आहे. गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. ही घटना एका बाउंड्री वॉलच्या आत झाली. घटनास्थळावर आढळलेल्या पुंगळ्यांवरून अशी माहिती समोर येतेय की दोन शस्त्रांमधून गोळ्या झाडल्या गेल्या. मृताच्या शरिरातही अनेक गोळ्या घुसल्या होत्या. चास पोलीस ठाण्याचे अधिकारी मोहम्मद रुस्तम यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनंतर घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. आता वेगवेगळ्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही फूटेजचा तपास केला जात आहे. महिलेचे पाय कापून निर्घृण हत्या, 7 वर्षांनी आरोपीला कोर्टानं सुनावली शिक्षा   जिथं ही घटना घडली ती एका बाउंड्रीत रिकामी जमीन आहे. पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केला की, मृत व्यक्ती भिंत ओलांडून बाउंड्रीत आली होती. त्याच्यासोबत आणखी काही लोकही असण्याची शक्यता आहे. त्यांनीच हा गोळीबार केला असावा. कारण गोळी दोन बंदुकांमधून झाडण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलीस आता शोध घेत आहेत की, गोळीबार दोन्ही बाजूंनी झाला की दोघांनी व्यक्तीचा खून केला. आता शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहिली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18
  • First Published :
जाहिरात
जाहिरात