Home /News /crime /

तरुणाचं होत होतं लग्न, प्रेयसीनं नेलं पळवून; नवरी राहिली वाट पाहत

तरुणाचं होत होतं लग्न, प्रेयसीनं नेलं पळवून; नवरी राहिली वाट पाहत

लग्नाच्या दिवशी तरुण गायब होण्यामागचं रहस्य चौकशीतून समोर आलं आहे. लग्नाच्या काही तास अगोदर तरुणाला प्रेयसीला पळवून नेलं आणि वऱ्हाडी मात्र वाट पाहत राहिले.

    जयपूर, 5 डिसेंबर: आपल्या बॉयफ्रेंडचं लग्न ठरल्याचं समजल्यावर तरुणीनं (Youth runs away with girlfriend) त्याला पळवून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. तरुणाचं लग्न त्याच्या (Marriage against will) मनाविरोधात घरच्यांनी ठरवलं होतं. लग्नासाठी वऱ्हाडी मंडळीदेखील जमली होती. मात्र लग्नाला काही (Run away few hours before marriage) तास उरले असताना तरुण गायब झाला होता. त्याचं कारण आता समोर आलं असून त्याच्या प्रेयसीनं त्याला पळवून नेल्याची माहिती समोर येत आहे. अशी घडली घटना लग्नासाठी वधूच्या गावी वऱ्हाड निघायला काही मिनिटं बाकी असताना नवरदेव घरातून पळून गेल्यामुळे गोंधळ उडाला. राजस्थानच्या झुंझुनू भागात रवी कुमार नावाच्या तरुणाचं लग्न ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही वेळातच नवरदेवाला घेऊन वऱ्हाड येईल आणि थाटामाटात लग्न पार पडेल, या तयारीत वधूकडील मंडळी सज्ज होती. रवीच्या घरीदेखील सर्व तयारी पूर्ण झाली होती. पाहुणेमंडळी जमली होती आणि काही वेळातच घरातून वधूच्या घरी प्रस्थान होणार होतं. नवरदेव पडला बाहेर वऱ्हाड निघण्यापूर्वी काही वेळ नवरदेव रवी घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडला. थोड्याच वेळात परत येतो, असं सांगून तो बाहेर गेला खरा, मात्र वऱ्हाड निघण्याची वेळ झाली तरी परतला नाही. काही वेळ घरच्यांनी आणि पाहुणेमंडळींनी त्याची वाट पाहिली. मात्र बराच वेळ उलटूनही तो न आल्यामुळे सर्वांना चिंता वाटू लागली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत रवी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लावला शोध रवीचं त्याच्यात गावातील एका तरुणीवर प्रेम होतं. आपलं लग्न झालं, तर प्रेमकहाणी अपूर्ण राहिल, असं वाटून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला आणि त्याच दिवशी पळून जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाला निघण्यापूर्वी काही तास अगोदर रवी घराबाहेर पडला आणि या तरुणीसोबत पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे वाचा- बॉयफ्रेंडला बोलावलं घरी, गर्लफ्रेंडच्या आईला पाहून बसला धक्का हरियाणातून आणलं परत राजस्थानमधून रवी हा हरियाणात गेल्याचं पोलिसांना समजलं. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि पुन्हा आपल्या गावी आणण्यात आलं. सूत्रांनी या प्रेमप्रकरणाची माहिती दिली असली, तरी पोलिसांनी मात्र अद्याप त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Girlfriend, Love story, Marriage, Rajsthan

    पुढील बातम्या