'मैत्री'ची हत्या...महागडी कार घेण्यासाठी त्याने मित्राचं अपहरण करून केला खून

'मैत्री'ची हत्या...महागडी कार घेण्यासाठी त्याने मित्राचं अपहरण करून केला खून

धक्कादायक बाब म्हणजे त्याने हे असं कृत्य करण्यासाठी एक चित्रपट बघितला आणि त्यातून त्याची खून करण्याची विकृत प्रवृत्ती बळावली.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 12 जानेवारी : आपला छंद पूर्ण करण्यासाठी एका मित्रानेच त्याच्या जिवलग मित्राची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड मध्ये उघडकीस आलीय ,मित्रत्वाच्या नात्याल्या काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अब्दुल अहाद सिद्दीकी असं पीडीत तरुणाचं नाव आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरात रहाणाऱ्या 17 वर्ष वयाच्या ह्या तरुणाची त्याच्याच मित्राने गळा आवळून हत्या केली. शनिवारी अब्दुल घरातून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना एक निनावी फोन आला ज्यावरून अब्दूलच्या सुटकेसाठी त्यांनी 40 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. ही बाब अब्दुलच्या घरच्यांनी पोलिसांना कळवली, पोलिसांनी अब्दूलचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता.

अब्दुलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवली आणि अब्दुलचा मित्र असलेल्या उमर शेखच्या मुसक्या आवळल्या. तेव्हा उमर ने अब्दुलची हत्या कशी आणि का केली हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. केवळ महागडी कार घेण्यासाठी लागणारे पैसे मिळावेत म्हणून उमर ने हे कृत्य केलं. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्याने हे असं कृत्य करण्यासाठी एक चित्रपट बघितला आणि त्यातून त्याची खून करण्याची विकृत प्रवृत्ती बळावली.

शाहरुखची Audi घेऊन मित्रांची पार्टी, दारु प्यायला नकार दिला म्हणून एकाची हत्या

या घटनेतील आणखी एक दुर्दैवी बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. ती म्हणजे,अब्दुलच्या कुटुंबीयांकडे एवढे पैसे होते ही उमर ला मिळालेली माहिती खोटी होती. उमरला ती माहिती कुणी दिली होती, हत्येच्या कटात आणखी कुणी सामील होतं का? या सगळ्यांचा तपास पोलीस घेताहेत. मात्र खोट्या माहितीच्या आधारावर आणि पैसे मिळण्याच्या लालसेपोटी उमर ने आपल्या मित्राचाच नाहीतर मित्रत्वाच्याच नात्याचा गळा घोटला असंच बोललं जातंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 12, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading