नवी दिल्ली 12 जानेवारी : राजधानी दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. अलिशान ऑडी घेऊन पार्टीसाठी गेलेल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये दारु पिण्यावरून भांडण झालं आणि त्यात एका मित्राची इतरांनी हत्या केली. या मित्राने दारु प्यायला नकार दिल्याचं कारण झालं आणि इतरांनी मिळून त्याची हत्या केली. अरशद खान असं मृत्यू पावलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अरशच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलीय. अरशद खानच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार अरशदचे तीन मित्र जुलेकर, रिजवान आणि लुकमान हे त्याच्या घरी आले होते. त्या तिघांनी अरशदला फरीदाबादला पार्टीसाठी येण्याचा आग्रह केला. मित्रांच्या आग्रहावरून अरशदने त्याचा मित्र शाहरुख खान यांच्याजवळून ऑडी घेऊन हे सर्व जण पार्टीसाठी गेले होते. पार्टीत सर्वांनी दारु घेतली मात्र अरशदने दारु पिण्यास नकार दिला. आपली कार अजून परत आली नसल्याने शाहरुखने अरशदला मध्यरात्री फोन केला होता. त्यावेळी अरशद सर्व प्रकरण त्याला सांगितलं आणि दारु घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी मित्रांनी दिल्याचं त्यांने सांगितलं. त्यावेळी तो खूप घाबरला होता अशी माहिती शहारुखने दिलीय. त्यानंतर सकाळपर्यंत अरशद घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यावेळी अरशदच्या हत्येचा उलगडा झाला. खंडणीसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, पुणे विद्यापीठ परिसरात फेकला मृतदेह मित्रांमध्ये भांडण झालं आणि तिघांनी मिळून अरशदची हत्या केली आणि शव एका तलावात फेकून दिलं होतं. तलावाजवच ऑडीही सापडली. अरशदचा फोनही मित्रांनी तलावात फेकून दिली होता. पार्टीसाठी निघाल्यानंतर या तिघांनी फोटो काढून ते फेसबुकवर शेअरही केले होते. त्या पोस्टमुळेही आरोपींची ओळख पटण्यात पोलिसांना मदत झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.