मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Loud Music ऐकून भडकला शेजारी, गोळी घालून काढला राग

Loud Music ऐकून भडकला शेजारी, गोळी घालून काढला राग

शेजारी जोरजोरात म्युझिक लावतो, याचा तरुणाला इतका राग आला की त्याने थेट शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या.

शेजारी जोरजोरात म्युझिक लावतो, याचा तरुणाला इतका राग आला की त्याने थेट शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या.

शेजारी जोरजोरात म्युझिक लावतो, याचा तरुणाला इतका राग आला की त्याने थेट शेजाऱ्यावर गोळ्या झाडल्या.

फ्लोरिडा, 27 डिसेंबर: शेजाऱ्यानं (Neighbour) मोठ्या आवाजात लावलेलं संगीत (Loud Music) सहन न झाल्यामुळे तरुणाने त्याच्यावर गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे. शेजारी सतत लावत असलेल्या संगीताचा आवाज तरुणाला सहन होत नव्हता. आपल्या खासगीपणाच्या हक्कावर ही गदा असल्याचं त्याचं म्हणणं होतं. शेजाऱ्याला काहीही करून धडा शिकवायचा या विचारात असतााच पुन्हा शेजाऱ्याने मोठ्या आवाजात गाणी लावली. त्यामुळे भडकलेल्या तरुणाने स्वतःची बंदूक उचलत थेट शेजाऱ्याचं घर गाठलं. 

हाणामारी ते गोळीबार

आपल्याला या संगीताचा त्रास होत असून ते तातडीनं बंद करण्यात यावं, अशी सूचना तरुणाने शेजाऱ्याला केली. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या 31 वर्षाच्या जाचारी मोनकाडा नावाच्या तरुणाने शेजाऱ्याला बंदूकही दाखवली. त्यानंतर दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि बघता बघता प्रकरण हाणामारीवर पोहोचलं. शेजाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही प्रचंड चिडले होते आणि एकमेकांच्या अंगावर अक्षरशः धावून जात होते. काही केल्या दोघंही मागे हटत नव्हते आणि हाणामारी वाढत चालली होती. 

रागात केला गोळीबार

तरुणाने रागाच्या भरात त्याच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यातील एक गोळी शेजाऱ्याच्या पाठीला लागली. त्यानंतर इतरांनी तरुणाला पकडून त्याच्याकडील बंदूक काढून घेतली आणि त्याला निशःस्त्र केलं. मात्र तोपर्यंत शेजारी जखमी झाला होता आणि त्याच्या वेदना वाढल्या होत्या. 

हे वाचा -

हॉस्पिटलमध्ये उपचार

गोळीबार झाल्यानंतर शेजाऱ्याला त्याच्या कुटुंबींयांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि उपचार सुरू केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिली आहे. तर गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

First published:
top videos

    Tags: Crime, Gun firing, Rock music