कन्नौज, 27 डिसेंबर: DGGI आणि आयकर विभागाकडून (Income Tax) टाकण्यात आलेल्या छाप्यात (Raid) अशा जागी लपवून ठेवलेली करोडोंची संपत्ती (Crores of rupees) सापडली आहे, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. तब्बल 17 कोटी कॅश (17 cr cash) आणि 23 किलो सोनं (23 kg gold) या धाडीत पकडण्यात आलं असून जसजशी ही संपत्ती अधिकाऱ्यांना सापडत गेली, तसतसं आश्चर्य आणखीनच वाढत गेलं. एवढी प्रचंड संपत्ती पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा जबर धक्का बसला.
अंडरग्राउंड टाकीत लपवली रक्कम
कन्नौजमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी पियूष जैन याच्या फॅक्टरीवर ही धाड टाकण्यात आली. धाड टाकून तपास करत असताना पोलिसांना एक अंडरग्राउंड टाकी सिल करून ठेवल्याचं दिसलं. पोलिसांनी ती टाकी फोडून आतमध्ये पाहिलं असता तिथं त्यांना कोट्यवधी रुपये लपवून ठेवल्याचं आढळलं. या टाकीतून अधिकाऱ्यांनी 17 कोटी कॅश आणि 23 किलो सोनं बाहेर काढलं. या सोन्यावर आंतरराष्ट्रीय मार्कदेखील असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मेडिकल करून पियुष जैनला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोण आहे पियूष जैन?
पियुष जैन हा एक अत्तर व्यावसायिक असून उत्तर प्रदेशातील बडं प्रस्थ आहे. एकूण 40 कंपन्यांचा तो मालक असून त्यापैकी दोन कंपन्या मिडल इस्टमध्ये आहेत. कन्नौजमध्ये जैन याच्या नावे कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपदेखील आहेत. त्याच्या कंपनीचं अत्तर परदेशात एक्सपोर्ट होतं. पियूषचं मुंबईतही एक अलिशान घर असल्याची माहिती आहे.
हे वाचा -
बेडमध्ये भरले होते पैसे
DGGI आणि आयकर विभागाचं हे धाडसत्र जवळपास 36 तास सुरु होतं. या धाडीदरम्यान जवळपास 180 कोटी रुपयांची रोख रक्कम अधिकाऱ्यांना सापडली आहे. भिंती, कपाटं यासोबत बेडमध्येही नोटा भरून ठेवण्यात आल्या होत्या.
पियूषने दिली कबुली
पियुषने दिलेल्या कबुलीनुसार जीएसटी न भरता केलेल्या व्यवहारांशी संबंधित ही कॅश आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Income tax, Raid, Uttar pardesh