जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पंचाईत! चारही गर्लफ्रेंड एकदम आल्या घरी, टेन्शनमुळे तरुणानं घेतलं विष

पंचाईत! चारही गर्लफ्रेंड एकदम आल्या घरी, टेन्शनमुळे तरुणानं घेतलं विष

पंचाईत! चारही गर्लफ्रेंड एकदम आल्या घरी, टेन्शनमुळे तरुणानं घेतलं विष

चारही गर्लफ्रेंड एकाच (Youth consumes poison after four girlfriends comes to home at a time) वेळी घरी आल्यामुळे टेन्शन आलेल्या तरुणाने विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 12 नोव्हेंबर: चारही गर्लफ्रेंड एकाच (Youth consumes poison after four girlfriends comes to home at a time) वेळी घरी आल्यामुळे टेन्शन आलेल्या तरुणाने विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाने एकाच वेळी चार तरुणींसोबत रिलेशनशिप (Relatioship with four girls at a time) प्रस्थापित केली होती. एकमेकींना थांगपत्ता लागू न देता हा तरुण चारही मुलींसोबत अफेअर करत होता. मात्र तरुणींना याची कल्पना (Girls decided to teach lesson) आल्यावर त्यांनी तरुणाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. चारही गर्लफ्रेंड आल्या एकत्र पश्चिम बंगालमधील कूचबिहार परिसरात एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणाने चार मुलींसोबत एकाच वेळी संबंध प्रस्थापित केले होते. मात्र काही काळातच त्यातील एका तरुणीला तरुण आपल्यासोबत चिटींग करत असल्याचा संशय आला. तिने मोठ्या हुशारीनं तरुणाचा माग काढत त्याच्या दिनक्रमावर लक्ष ठेवलं. त्यातून त्या तरुणीला धक्कादायक माहिती समजली. आपल्याशिवाय या तरुणाला इतर तीन गर्लफ्रेंड असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्या तिघींचा पत्ता शोधत तरुणीने संपर्क साधला आणि वस्तुस्थितीची कल्पना दिली. तरुणीनी बांधला चंग चौघींसोबतही तरुण फसवणूक करत असल्याचं लक्षात आल्यामुळे संतापलेल्या तरुणींनी त्याला धडा शिकवण्याचा निश्चय केला. घटनेच्या दिवशी चौघीही एकाच वेळी तरुणीच्या घरी पोहोचल्या आणि तिथं त्यांनी हंगामा सुरू केला. यावेळी तरुण बाहेर होता. मात्र थोड्याच वेळात तो घरी आला आणि तिथलं चित्र पाहून काय करावं, हे त्याला सुचेना. प्रचंड तणावाखाली गेलेल्या या तरुणानं घरात शिरत विष खाल्लं आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हे वाचा- बाबो! तब्बल 64 लाख रुपयांत झाली या iPhone ची विक्री, कारण ऐकून हैराण व्हाल पोलीस केस नाही तरुणींनी अद्याप या तरुणाविरुद्ध कुठलीही तक्रार दाखल केली नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यात मर्यादा येत असल्याचं सांगितलं जात आहे. तरुणाची तब्येत सुधारत असून त्याच्या जीवाला असणारा धोका टळल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात