जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लोन अ‍ॅपद्वारे घेतलेल्या कर्जाने घेतला जीव, पुण्यातील तरुणासोबत घडला भयानक प्रकार

लोन अ‍ॅपद्वारे घेतलेल्या कर्जाने घेतला जीव, पुण्यातील तरुणासोबत घडला भयानक प्रकार

लोन अ‍ॅपद्वारे घेतलेल्या कर्जाने घेतला जीव, पुण्यातील तरुणासोबत घडला भयानक प्रकार

सोहेल शेख या तरूणाने लोन ॲपवरून कर्ज घेतले होते.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 20 सप्टेंबर : लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतल्यामुळे नंतर होणाऱ्या त्रासातून आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेतलेल्या तरुणाने आत्महत्या केली. सोहेल शेख असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोहेल शेख या तरूणाने लोन ॲपवरून कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज घेतल्यानंतर सोहेल शेख सोबद धक्कादायक प्रकार घडला. सदर कर्ज अव्वाच्या सव्वा व्याजाने परतफेडीसाठी अनोळखी नंबरवरून त्याला धमकी आणि बदनामीचे फोन येऊ लागले होते. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला होता. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने सोहेल शेख याने आत्महत्या केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी होते फसवणूक - लोन अ‍ॅप्स सुरूवातीला कागदपत्रांशिवाय कर्ज देण्याचं आमिष दाखवतात. यासाठी व्याजदरही मोठा आकारण्यात येतो. हे कर्ज तुम्ही वेळेत परत केलं, तर ठीक. अन्यथा, तुम्ही जर नुकतीच नोकरी गमावली असेल, किंवा व्याजाची रक्कम वाढत चालली असेल तर ईएमआयचा डोंगर तुमच्या डोक्यावर येतो. यानंतर रिकव्हरी करणारे लोन शार्क्स तुमची पब्लिकली उपलब्ध असलेली माहिती वापरून तुम्हाला धमकी देऊ लागतात. हेही वाचा -  पुणे : बदलीसाठी पैशाची मागणी, सावकाराकडून काढले कर्ज, नंतर जाचाला कंटाळून लेखाधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल यामध्ये मग तुमचे फेसबुकवरील फोटो घेऊन त्यांना अश्लीलरित्या मॉर्फ करून ते व्हायरल करण्याची धमकी देणं, किंवा तुमच्या ओळखीतील लोकांना किंवा कुटुंबीयांना फोन करून धमकी देणं असे प्रकार सुरू होतात. कित्येक लोक याबाबत काहीही करू शकत नाहीत, कारण कर्ज घेतलं होतं हे तर ते नाकारू शकत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात