फिरोजाबाद, 10 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात एका रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाचा आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष देत फेसबुक फ्रेंडवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - एका तरुणाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून नोएडा येथे तैनात असल्याचे सांगितले. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर दिल्लीतील पहाडगंज येथील हॉटेलमध्ये बोलावून लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये पोलिसांनी या तरुणाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. पीडितेने काय सांगितलं - पीडितेचा आरोप केला आहे की, ती 9 जून रोजी विमानाने आसामहून दिल्लीला पोहोचली. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन दिले आणि जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच पीडितेने पोलिसांना सांगितले की, अनेक दिवस तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तिला 22 जून रोजी फिरोजाबाद येथील गोल्डन टॉवर हॉटेलमध्ये लग्नाच्या बहाण्याने आणले होते. इथे त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तसेच मारहाण केली. या घटनेनंतर पीडित तरुणीने घटनास्थळावरुन कसेतरी आपला जीव वाचवत जसराणा पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी घडलेला प्रकार सांगितला. हेही वाचा - नोकरी करण्यास पतीचा होता विरोध; विषय कायमचा संपवायचा म्हणून थेट पत्नीलाच पीडितेने पुढे पोलिसांना सांगितले की, 20 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, सोन्याची चेन, अंगठी, नेकलेस, मोबाईल फोन आणि तिची महत्त्वाची कागदपत्रेही रोहितकडे आहेत. तिने त्याच्याकडे अनेकवेळा ते मागण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते दिले नाहीत. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांनी सांगितले की,आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो कोणत्याही पोलीस खात्यात नाही. तसेच त्याच्याविरोधात 392, 376, 342, 323 या कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.