जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / विरारमध्ये भरदिवसा खुनी थरार; तरुणावर झाडल्या 4 गोळ्या, शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल

विरारमध्ये भरदिवसा खुनी थरार; तरुणावर झाडल्या 4 गोळ्या, शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल

विरारमध्ये भरदिवसा खुनी थरार; तरुणावर झाडल्या 4 गोळ्या, शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल

Crime in Mumbai: मुंबईनजीक असणाऱ्या विरारमध्ये शनिवारी हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार (Gun firing) केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

विरार, 27 फेब्रुवारी: मुंबईनजीक (Mumbai) असणाऱ्या विरारमध्ये (Virar) शनिवारी हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार (Gun firing) केला आहे. संबंधित तरुणाला चार गोळ्या लागल्या असून तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात (Young man shot dead) पडला. यावेळी आसपासच्या लोकांनी तातडीने तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना संबंधित तरुणाची प्राणज्योत मालवली आहे. विरारमध्ये भरदिवसा हा खुनी थरार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच विरार पोलिसांनी शिवसेना नेत्यासह (Shivsena leader) नऊ जणांवर गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. समय चौहान असं हत्या (Samay Chauhan murder) झालेल्या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो एक व्यापारी असून फर्निचर आणि बाजार भरवण्याचं काम करत होता. घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी तो मनवेल पाडा येथून आपल्या घराकडे निघाला होता. घराच्या दिशेनं जात असताना, याठिकाणी आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. हेही वाचा- एकाच दुचाकीनं केला अखेरचा प्रवास; मध्यरात्री 4 मित्रांचा झाला भयावह शेवट या हल्ल्यात मृत समयला चार गोळ्या लागल्या आणि तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी आसपासच्या लोकांनी समयला तातडीने अलायन्स या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. गोळ्या लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. हत्येची माहिती मिळताच विरार पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका शिवसेना नेत्याचा देखील समावेश आहे. हेही वाचा- पत्नीनं दारुड्या पतीला घेतलं नाही घरात; सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह सुदेश चौधरी (Sudesh chaudhari) असं गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव असून ते माजी नगरसेवक आणि वसई विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती देखील आहेत. पोलिसांनी या प्रकरणात माझं नाव का गोवलं, ते मला माहीत नाही. मात्र मी पोलीस चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असं सुदेश चौधरी यांनी सांगितलं आहे. हल्लेखोरांनी ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. मृत समय चौहान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती होता. त्याच्यावर यापूर्वी एक हत्येचा गुन्हा देखील दाखल आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात