तासगाव, 04 एप्रिल: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने लग्नाच्या (Marriage) अवघ्या चौथ्या दिवशीचं मृत्यूला कवटाळलं आहे. त्याने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली (Young Man commits Suicide) आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेची पुढील कार्यवाही तासगाव पोलीस करत आहेत.
अवघ्या चार दिवसांपूर्वी (30 मार्च) मृत तरुणाचं लग्न झालं होतं. लग्नातील हळदीचा रंगही अजून उडाला नव्हता, तोपर्यंत या तरुणाने असं धक्कादायक पाऊल उचललं आहे. याप्रकरणामुळे संबंधित कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. लग्नासाठी आलेली पाहुणे मंडळीही अजून गेली नव्हती, तोपर्यंत आलेल्या या दुःखद घटनेनं संपूर्ण परिवराला दुःख सागरात लोटलं आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या का केली? याच नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.
दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृत तरुणाचं नाव सदानंद महादेव पवार असून तो सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिखलगोठण येथील रहिवासी आहे. त्याने शुक्रवारी 2 मार्च रोजी रात्री उशीरा वाझर रस्त्यावरील एक शेतात गेला. तेथील एका झाडाला दोरी बांधून त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येच्या ठिकाणी त्याची दुचाकी देखील उभी होती. त्यामुळे शनिवारी सकाळी काही लोकांना त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
हे ही वाचा - पत्नीसोबत झालेल्या वादाचा बदला म्हणून मेव्हुण्याच्या गर्भवती पत्नीवर बलात्कार
21 वर्षीय तरुणाने अशा पद्धतीने अर्ध्यावरती संसार मोडून मृत्यूला कवठाळल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर तासगाव पोलीस आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Husband suicide, Sangali